वाचा: Tokenization System: १ जुलैपासून ऑनलाइन पेमेंटसाठी डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये होणार ‘हे’ बदल, पाहा डिटेल्स
फिक्स्ड लाइन कनेक्शनसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील मिळते. या प्लानसह, BSNL युजर्सना पहिल्या महिन्याच्या बिलावर ५०० रुपयांपर्यंत म्हणजेच ९० % पर्यंत सूट देत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात कोणतेही अतिरिक्त लाभ उपलब्ध नाहीत. अंतिम बिलाच्या किमतीमध्ये १८ % GST देखील समाविष्ट केला जाईल. हा एक उत्तम ब्रॉडबँड प्लान आहे. ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त users आहेत जे अतिशय संयत पद्धतीने इंटरनेट वापरतात. ६० Mbps स्पीडसह, विद्यार्थी सहजपणे ऑनलाइन अभ्यास करू शकतात आणि ऑफिसला जाणारे घरबसल्या काम करू शकतात.
BSNL चे इतर प्लान्स:
जर तुम्हाला OTT फायद्यांसह BSNL प्लान हवा असेल तर, तुम्ही BSNL चे इतर प्लान्स देखील एक्सप्लोर करू शकता. जे, चांगला वेग देतात. ७४९ चा प्लान OTT लाभांसह येतो आणि १०० Mbps स्पीड देतो. खास गोष्ट म्हणजे ७४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना दर महिन्याला फक्त १००० GB डेटा मिळतो बीएसएनएलचेही स्वस्त प्लान्स देखील आहेत. एन्ट्री लेव्हल BSNL ब्रॉडबँडप्लान ३२९ रुपये प्रति महिना (कर वगळून) खरेदी करता येतो. BSNL ब्रॉडबँड प्लान खरेदी करण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या BSNL Officeशी संपर्क साधू शकता.