अकोला : जिल्ह्यात चोरट्यांची नवीन टोळी सक्रिय झाली असून या चोरांनी चोरीचा नवीन फंडा सुरू केला आहे. हे चोरटे फक्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. वयोवृद्ध महिलांची लूट केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील वाशिम बायपासजवळ असलेल्या रिजवान कॉलनीमध्ये ७५ वर्षीय वयोवृद्ध महिला ही मार्केटमधून खरेदी करून घराकडे परतत होती. तेव्हा वाटेत दोन अनोळखी इसम तिच्याजवळ आले आणि म्हणाले, ‘सेठजीला खूप वर्षांनी मुलगा झाला, त्यामुळे ते बाजूलाच कपड्यांचे वाटप करत आहेत. तुम्ही पण चला आजी, तुम्हाला पण कपडे मिळतील,’ अशी भूलथाप चोरट्यांनी दिली आणि महिलेला रस्त्यापासून बाजूला नेले. तिथे या आजीच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

Amruta Fadnavis: तुम्ही चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलेय का ओ मॅडम?; अमृता फडणवीस स्पष्टच म्हणाल्या…

दुसऱ्या एका घटनेत रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत एक वयोवृद्ध महिला फतेह चौक मार्गाने मार्केटमध्ये खरेदी करत होती. तिच्याजवळ दोन लोक आले आणि पुन्हा साडीपाटप सुरू असल्याचीच भूलथाप देत या महिलेलाही लुटलं. याप्रकरणी आता जुने शहर आणि रामदास पेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी वयोवृद्ध महिलांनी कामानिमित्त एकटे घराबाहेर पडू नये किंवा बाहेर गेल्यास अनोळखी लोकांशी बोलू नये, असं आवाहन अकोला पोलिसांकडून करण्यात आलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.