healthier not to wear socks : फॅशन ट्रेंड खूप लवकर बदलते आणि इंटरनेटमुळे तर, फॅशन ट्रेंडमध्ये झपाट्याने बदल झाला आहे. कधी घट्ट जीन्स घालून लोक स्वतःला कूल समजतात तर कधी लूज फिटिंग जीन्स घालण्याचा ट्रेंड येतो. अशीच नव्या चपलांची फॅशनही येते आणि आजकाल लोक मोजे नसलेले शूज घालू लागले आहेत. लहान मोजे घालण्याची फॅशन फार पूर्वीपासून असली तरी आजकाल मोज्यांशिवाय बूट घालण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे.

तुम्हाला देखील सॉक्स न घालता शूज घालण्याची सवय असेल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. नुकत्याच एका रिसर्चमध्ये, सॉक्सशिवाय शूज घालणे हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जात आहे. याचा संबंध फक्त पायांशी नाही तर संपूर्ण शरीराशी संबंधित आहे. चला पाहूया रिसर्चमधून समोर आलेली धक्कादायक माहिती. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​सॉक्स न घातल्यामुळे येतो खूप घाम

अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या पायातून जवळपास ३०० मिली घाम येतो. सॉक्समुळे हा घाम पुसला जात नाही. यामुळे पायाला सतत ओलसरपणा आणि घाम जाणवत राहतो. पायातील मॉश्र्चर लेवल वाढल्यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगल संक्रमणाचा धोका अधिक जाणवतो.

(वाचा – Diabetes and Frozen Shoulder:डायबिटीजमुळे खांदे दुखीचा त्रास होतो; हे १० उपाय सांध्यांचं दुखणं करतील गायब))

​सॉक्स न घातल्यामुळे येतो खूप घाम

अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या पायातून जवळपास ३०० मिली घाम येतो. सॉक्समुळे हा घाम पुसला जात नाही. यामुळे पायाला सतत ओलसरपणा आणि घाम जाणवत राहतो. पायातील मॉश्र्चर लेवल वाढल्यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगल संक्रमणाचा धोका अधिक जाणवतो. प्रत्येकाचा घाम वेगळा असतो. अनेकांच्या घामाला बॅक्टेरिया वेगवेगळा असतो. यामुळे त्याचे पाय सडण्याची देखील शक्यता असते.

(वाचा – डेंग्यूमध्ये पोटात का दुखतं? यामागचं कारण अतिशय महत्वाचं; दुर्लक्ष कराल तर जिवावर बेतेल))

​सॉक्सशिवाय पायाला भेगा पडतात

सॉक्समुळे फक्त पायाचा घामच निघून जातो असं नाही. सॉक्स पायात असल्यामुळे तळवे अतिशय सॉफ्ट आणि स्वच्छ राहण्यास मदत होते. लेदर किंवा सिंथेटिक शूजच्या टाचा अतिशय कठीण असतात. त्यामुळे तळव्यांना त्रास होतो. यामुळे तळव्यांना भेगा पडतात. त्यामुळे पायात सॉक्स असतील तर त्याचा फायदाच होतो.

(अंगात १०३ डिग्री ताप, Monkeypox च्या जाळ्यात अडकलेल्या सेक्सुअल हेल्थ वर्करचा अनुभव अंगावर शहारा आणेल)

​ब्लड सर्क्युलेशनवर होतो परिणाम

सॉक्स न घातल्यामुळे फक्त पायांनाच त्रास होतो असं नाही तर रक्तप्रवाहावार देखील मोठा परिणाम होतो. तसेच रक्तप्रवाहाशी संबंधित वेगवेगळ्या समस्या देखील जोडले जातात. मोजे न घालता शूज घातल्याने पायाच्या काही भागांवर अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे त्या भागांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. तसेच सॉक्स न घातल्यामुळे हवेच्या संपर्कात येतात. डायरेक्ट एसी लागल्यामुळे देखील पायाला त्रास होतो.

(वाचा – Monkeypox Prevention : भारतीय डॉक्टरांनी मंकीपॉक्सपासून वाचण्याचे सांगितले, ६ अतिशय सोपे उपाय

​अशावेळी काय करायला हवं

प्रथम आपण आपल्यासाठी कोणते शूज योग्य आहेत ते शोधले पाहिजे. खूप घट्ट शूज घालणे टाळा आणि खूप सैल शूज परिधान केल्याने देखील पडण्याचा किंवा घसरण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच योग्य आकाराचे शूज घालणे महत्त्वाचे आहे. चांगल्या दर्जाचे मोजे ठेवा आणि ते रोज घाला. एक दिवसापेक्षा जास्त मोजे घालू नका. दररोज मोजे धुवायला टाका. अनेकदा अस्वच्छ सॉक्समुळे पायाला त्रास होतो.

(वाचा – Moong Dal Side Effects : पोषणतत्वांनी भरलेली मूग डाळ ‘या’ लोकांसाठी अतिशय घातक; आरोग्यावर होतो विपरीत परिणाम)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.