मुंबई : अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं करोना काळात लग्न करून फॅन्सना सुखद धक्का दिला होता. ते लग्न दुबईत झालं. या जोडप्याने दुबईमध्ये अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात आणि मग नोंदणीकृत विवाह केला होता. त्यांच्या घरच्यांनी आणि मित्र- मैत्रिणींनी व्हिडिओ कॉलवरच त्यांचं लग्न पाहिलं होतं. नंतर लंडनमधील लग्नात सारेच कुटुंबिय उपस्थित होते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ‘अखेर आम्ही केलं.’ अशी कॅप्शन दिली होती.

लग्न म्हणजे अनमोल क्षणांची तिजोरी. त्याला आपले कलाकारही अपवाद नाहीत. या कलाकारांचा लग्नसोहळा कसा साजरा केला जातो, त्यांनी लग्नात कोणते कपडे घातले असतील, काय दागिने घातले होते, जेवणाची पंगत कशी रचली होती, त्यांनी किती धमाल केली असेल अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते.

कलरफुल प्रेमाची गोष्ट सांगणार सोनल, ‘दगडी चाळ २’मधल्या पूजा सावंतची रोमँटिक अदा इथे पाहा

चाहत्यांची हीच उत्सुकता लक्षात घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा भव्य विवाह सोहळा पाहता येणार आहे. नुकतंच या सोहळ्याचं निमंत्रण प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारे देण्यात आलं. त्यामुळे लवकरच आता चाहत्यांना सोनालीच्या आयुष्यातील सुवर्णक्षणांचा साक्षीदार होता येणार आहे.

एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात उपस्थितांना सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण लग्नसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे. यावर सोनाली कुलकर्णी म्हणते, ” ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे प्रक्षेपण केलं जात आहे. ज्यांना माझ्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाता आलं नाही त्यांना आणि माझ्या जगभरातील चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ माझ्या चाहत्यांपर्यंत माझं लग्न पोहोचवत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच चांगली आहे.”

सारा आणि इब्राहिमबरोबर कसं नातं आहे करिनाचं? अभिनेत्रीच्या उत्तरानं चाहत्यांची जिंकली मनं!

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “कलाकार आणि त्यांचे चाहते यांच नातं आगळं वेगळंच असत आणि त्यात जर आपल्या लाडक्या कलाकारांचे लग्न असेल तर चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच लेव्हलला असते. त्यात तर सोनालीने सातासमुद्रापार लग्न केलं. तेही अगदी मराठमोळ्या पद्धतीनं. ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. म्हणूनच आम्ही ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर हे लग्न दाखवत आहोत.’’

सिनेमा लिहिणं लग्न लावण्यासारखं असतं असं प्रियदर्शन जाधव का म्हणतोSource link

Leave a Reply

Your email address will not be published.