तुम्ही ऐकले असेलच स्तनपान केल्याने दररोज ३०० ते ५०० कॅलरीज बर्न होतात. गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्याचा हा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे पण दुसरीकडे, तुम्ही असेही ऐकले असेल की, स्तनपान बंद केल्यानंतर मातांचे वजन वाढते. त्यामुळे स्तनपान थांबवल्यानंतर लवकरच वजन वाढणे सामान्य आहे का? तुम्हाला याची काळजी करण्याची गरज आहे का?

जेव्हा तुम्ही स्तनपान थांबवता तेव्हा वजन वाढते का?
स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये वजन वाढणे सामान्य आहे, परंतु याची अनेक कारणे आहेत जसे की, जास्त कॅलरी खाणे, कॅलरी बर्न कमी करणे आणि हार्मोन्स इत्यादी. गर्भधारणा झाल्यानंतर लगेचच शरीरात हार्मोनल बदल होतात आणि प्रसूतीनंतर बाळाला दुध देणे बंद करेपर्यंत ते बदल राहतात. हे हार्मोन्स गर्भवती महिलेच्या शरीरात अनेक बदल घडवून आणतात जे तिने स्तनपान थांबवण्यापर्यंत चालू राहतात. महिलांनी स्तनपान बंद केले तेव्हा त्यांचे वजन कशामुळे वाढते आणि ते हे वाढते वजन कसे थांबवू किंवा नियंत्रित करू शकतात ते जाणून घेऊया.

(फोटो सौजन्य :- टाइम्स ऑफ इंडिया)

अधिक कॅलरीज खाणे

स्तनपानाच्या वेळी, आपल्या शरीराला दूध बनवण्यासाठी अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे तुमच्या जेवणाचे प्रमाण वाढते. जेव्हा तुम्ही स्तनपान थांबवता, तेव्हा तुम्ही जास्त कॅलरी घेणे थांबवायला विसरता आता जर तुम्ही स्तनपान करत नसाल तर तुम्ही कॅलरीज बर्न करत नाही पण तुम्ही नक्कीच जास्त कॅलरीज खात आहात. हे तुमचे वजन वाढण्याचे कारण असू शकते. यावेळी सोडले जाणारे प्रोलॅक्टीन हार्मोन वाढवते. स्तनपान थांबवल्यानंतर, हा हार्मोन चरबी पचवण्याचे काम कमी करतो आणि हळूहळू कमी होऊ लागतो. कदाचित यामुळे तुमचे वजन वाढत असेल.

(वाचा :- पुरूषांनो, लग्न झालं असेल तर घ्या ‘या’ गोष्टींची खास काळजी, नाहीतर आयुष्याचे वाजतील बारा..!)

वजन कसे कमी करावे

स्तनपान थांबवल्यानंतर, तुम्ही काहीही खाऊ शकता असा विचार करू नका. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. म्हणूनच तुम्ही हेल्दी स्नॅक्स खा. डॉक्टरांशी बोलल्यानंतर, दररोज १५ मिनिटे मध्यम व्यायाम करू शकता.

(वाचा :- sologamy : मैं अपनी फेवरेट हूँ ! स्वतःशी लग्न करण्याचा नवा ट्रेंड , जाणून घ्या सोलोगामीबद्दल सर्व काही)

कॅलरी कमी करा

हे स्पष्ट आहे की वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी करावे लागेल. पटकन वजन कमी करण्यासाठी कोणत्याही आहारावर अवलंबून राहू नका. तुमच्या शरीराचा संकेत समजून घ्या आणि तुमच्या भूकेनुसार खा परंतु जास्त खाणे टाळा.

(वाचा :- नव-याने पोटावर बुक्की मारली कारण पोटातलं बाळ मरावं, मग फातिमाने घटस्फोट घेतला आणि कमावले तब्बल 30 लाख रूपये..!)

जीवनशैली बदला

व्यायाम हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, पण काही कारणास्तव व्यायाम करता येत नसेल तर किमान पायऱ्या चढायला सुरुवात करा किंवा दररोज काही वेळ चालत जा.

(वाचा :- अनुष्का शर्मापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची वैवाहिक आयुष्यातील मोठमोठी सिक्रेट्स उघड, हे असंही असतं..?)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.