बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या हॉट लूकमूळे चर्चेत असते. ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत लाखो लोकांना प्रेरणा देत असते. फिटनेस सोबतच तिच्या लूकची चर्चा देखील सर्वकडे होत असते. वयाच्या ४८ व्या वर्षांतही मलायका खूप सुंदर आणि बोल्ड दिसते. पार्टी असो किंवा इव्हेंट, प्रत्येक फंक्शनमध्ये मलायकाचा लूक सर्वांत हटके असतो.

सर्वांमध्ये मलायका नेहमीच वेगळी दिसते. साध्या कपड्यातही ही अशा आत्मविश्वासात वावरते की मलायकावरुन लोकांच्या नजराच हलत नाही.नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे त्यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून इंटरनेटचा पाराच वाढलेला दिसत आहे.
(फोटो सौजन्य – Instagram @meghnabutanihairandmake, @manekaharisinghani)

मलायका या डिझायनरच्या आउटफिटमध्ये दिसली

मलायका अरोराचे काही हॉट आणि बोल्ड फोटो समोर आले आहेत, या फोटोमध्ये मलायकाने फॅशन स्टायलिस्ट मनेका हरी सिंघानीच्या सिल्वर सिक्वेन्ड गाउनमध्ये दिसली. फॅशन डिझायनर युसेफ अल जसमीच्या कलेक्शनमधून या सुंदर गाऊनची निवड करण्यात आली होती. या सुंदर गाऊनला एक सुंदर सीक्वेन्स जोडल्यामुळे या गाऊनच्या सौदर्यात आजूनच भर पडली आहे.

(वाचा :- Disha Parmar bralette : छोटीशी पॅंट व ब्रालेट घालून दिशा परमारने फ्लॉन्ट केली सडपातळ कंबर, हॉटनेसपुढे सुर्यही फिका, बोल्ड फोटोज तुफान व्हायरल..!)

ग्लॅमरस ब्लिंगी ड्रेस

या ग्लॅमरस ब्लिंगी ड्रेसला एक जबरदस्त लूक देण्यासाठी साधी नेकलाइन ठेवण्यात आली होती. या सुंदर ड्रेसला एका पायाला कट देण्यात आला आहे. तर एका हाताला मोठं कापड देण्यात आलं आहे. तुम्ही जर असा लूक करणार असाल तर अशा ड्रेसवर जास्त दागिने घालणं टाळाच.

(वाचा :- अबब ! सोन्याची खाणच जणू, १४ लाखांचा ड्रेस घालून नोरा फतेहीचा मॉडेल वॉक, सोशल मीडियावर फक्त ‘नोरा फिवर’)

मलायकाचे दागिने

मलायकाने या सुंदर गाऊनवर कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज घालण्याचा प्रयत्न केला. तिने कानात सुंदर चांदीचे झुमके आणि हिऱ्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. तर पायामध्ये सिल्व्हर स्ट्रॅपी सँडल घातल्या होत्या. तुम्ही देखील असाच लूक करणार असाल तर या ड्रेसवर कमीत कमी दागिने परिधान करा.

(वाचा :- आईच्या घरी स्टायलिश अंदाजात गेली मलायका अरोरा, जीन्सने वेधल्या सर्वांच्याच नजरा, बहिणीच्या पर्सची किंमत ऐकून चक्रावून जाल)

मलायकाचा मेकअप

मलायकाने या हॉट लूकसाठी तिचे केस मोकळे ठेवणं पसंत केलं. त्याच प्रमाणे आय-शॅडो, ब्लॅक आयलाइनर, मस्करा, लिपस्टिकमध्ये ही तिने न्यूडशेड वापरले आहेत. या ड्रेसवर मलायकाने केलेला मेकअप तिला खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा :- छोटासा स्कर्ट घालून मीरा राजपूतने शेअर केले बोल्ड फोटोज, घायाळ नवरा शाहीद कपूरलाही चक्क सोशल मीडियावर करावी लागली ‘ही’ कमेंट..!)

ड्रेसवरील डिझाईन

मलायकाच्या संपूर्ण ड्रेसवर चमकी देण्यात आली आहे. तिच्या या ड्रेसकडे पाहून ती जणू परीच वाटत आहे. तुम्ही देखील एखाद्या पार्टीला हा लूक करु शकता.

(वाचा :- अनुष्का शर्माचं स्विमसूट घालून फोटोशूट पाण्यातही लागली ‘आग’, फोटो पाहून नेटकरी घायाळ)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.