मुंबई: दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘पावनखिंड’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळलाच पण समीक्षकांनी देखील चित्रपटाचं कौतुक केलं. या सिनेमात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी साकारली होती. त्यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक झालं.


अजय यांनी बाजीप्रभू यांची भूमिका साकारलीच नाही तर ते ही भूमिका खऱ्या अर्थानं जगले. या भूमिकेनं अजय यांना दिलेलं समाधान दिलेलं मोठं आहे. पण त्याहून अधिक एक खास गोष्ट अजय यांनी शेअर केली आहे. अजय यांनी हा सिनेमा करताना एक स्वप्न पाहिलं होतं. ते त्यांचं स्वप्न आता पूर्वही झालं आहे.

घराचे फोटो

ज्या मातीत इतिहास घडला, बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजयचं स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. अजय यांच्या या नव्या घराचे काही फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. अजूनही अजयच्या घराचं काम सुरू आहे. फोटोमध्ये छोटं पण अगदी सुंदर घर पाहायला मिळत आहे. घराच्या बाहेरील बाजूला लाल आणि राखाडी रंग देण्यात आला आहे. तसंच घराची सुंदर रचना लक्ष वेधून घेणारी आहे. अजयचं हे स्वप्नातलं घर खरंच खूप सुंदर आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.