पुणे : माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत हडपसर कडून कात्रज कोंढवा रोडने कात्रज चौकात आले होते. कात्रज चौकातील जमाव उदय सामंत यांच्या गाडीभोवती जमा झाला. उदय सामंतांच्या गाडीला घेराव घातलेलल्यांनी गद्दार गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची मागील बाजूची काच फुटली आहे. उदय सामंतांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांनी याप्रकरणी माध्यमांकडून माहिती मिळाल्याचं सांगितलं.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

पत्रकारांनी उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याविषयी माहिती विचारली असता त्यांनी मला तुमच्याकडून माहिती समजल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. मला त्याबाबत माहिती नाही, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, ठाकरे समर्थकांवर आरोप, दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या

ते शिवसैनिक नसतील : विनायक राऊत

उदय सामंतांची गाडी फुटलीय याबाबत आम्हाला कोणतिही माहिती नाही. माध्यमांकडून आम्हाला कळतंय. ते लोक शिवसैनिक नसतील, असं विनायक राऊत यांनी म्हटलं. शिवसैनिकचं नाही इतर कुठल्याही पक्षाचे समर्थक नसतील, असंही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.

विकास ठाकूरने राष्ट्रकुलमध्ये जिंकले सलग तिसरे पदक, रौप्यपदकासह रचला मोठा विक्रम

उदय सामंत काय म्हणाले?

माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. कारण माझ्यावर चालून आलेल्या लोकांच्या हातात स्टिक होत्या. त्यांची भाषा अतिशय अर्वाच्य होती. संबंधित लोक शिवीगाळ करत होते. काही लोकांच्या लेखी मी गद्दार असेल, मी धोका दिला असेल. पण निषेधाचं हे माध्यम असू शकत नाही. जर कुणाच्या सांगण्यावरुन हा हल्ला झाला असेल तर हा प्रकार गंभीर आहे. माझ्यासोबत गाडीत बसलेल्या एका कार्यकर्त्याला जमावाचा दगड लागला असल्याने त्याला दवाखान्यात घेऊन चाललोय. मी पोलिस स्टेशनला जाऊन यासंबंधी तक्रार देणार आहे. मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी फोन करुन माझी विचारपूस केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना देखील योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंच्या सभेवरुन जाताना लोकांच्या हातात स्टिक, दगड कशासाठी? मला मारण्याचा कट होता : उदय सामंतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.