अकोला: तरुणाईने कुठेही फिरायला जाताना किती सतर्कता बाळगायला हवी याचं उदाहरण अकोला जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या ‘मोर्णा डॅम’ आणि ‘पातुर जंगल’ परिसर हा तरुणाई आणि प्रेमीयुगुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. इथे फिरण्यासाठी आलेल्या तरुणाईसह प्रेमीयुगुलांसोबत असं काही घडतं की ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या प्रेमीयुगुलांचे व्हिडिओ काढून त्यांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, बदनामी पोटी तरुणाई तक्रारीसाठी पुढे येणार नाही म्हणून हे टवाळखोर त्यांचं चित्रीकरण करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या ‘मोर्णा डॅम’ आणि पातुर जंगल पावसामुळे खुलले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे येथील नदी-नाले, छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. डोंगरांनी हिरवा शालू पांघरला आहे. त्यामुळे काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ वातावरण अनुभवण्यासाठी तरुणाई आणि पर्यटकांचा कल वाढलाय. या ठिकाणी येऊन ‘मोर्णा डॅम’, ‘पातुर जंगल’ ओके हाय, अशा प्रतिक्रिया पर्यटक देत आहेत. पण, आता हा परिसर चांगलाचं धोकादायक ठरत आहे. इथं फिरण्यासाठी येणारी तरुणाई आणि प्रेमीयुगुलांसाठी हा परिसर धोकादायक बनालाय.

हेही वाचा – समुद्रात वाहून गेलेल्या पत्नीचा आला व्हॉइस मेसेज; ‘मी रवीसोबत आनंदी आहे’…

असा घडतोय तरुणांईसोबत धक्कादायक प्रकार

फिरायला आलेली प्रेमीयुगुल या निसर्गरम्य वातावरणातील एका झाडाखाली बसलेले असतात. ते त्यांच्या गप्पागोष्टींमध्ये रमलेले असताना त्यांच्यासोबत असं काही घडतं की ऐकून धक्का बसणार. त्यांच्या गोष्टी रंगत असताना काही टवाळखोर मुलं त्यांच्याजवळ येतात आणि तुम्ही कुठले, कुठून आलात, इथे काय करताय, तुमच्या घरच्यांना लागलीच इथे बोलवा, असा दम देतात. याच दरम्यान या टवाळखोर मुलांपैकी एक मुलगा त्यांचं चित्रकरण म्हणजेच व्हिडिओ काढतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद होतो. कॅमेरा बंद केल्यानंतर या लोकांकडून हे टवाळखोर मुले पैसे घेतात. तर कित्येकांचे चित्रीकरण करून त्यांचे व्हिडिओ देखील वायरल करतात.

हेही वाचा –अशीही लव्ह स्टोरी, प्रेयसीचं दोनदा लग्न मोडलं, पंचायतने थेट निकाल लावला

शिक्षकाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

शनिवारी, पातुर तालुक्यातील पेशाने शिक्षक असलेली व्यक्ती एका तरुणीसोबत याचं परिसरात फिरायला आला, यावेळी त्याच्यासोबत देखील हाच प्रसंग घडला. आता या शिक्षकासह त्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यासंदर्भात आमच्या ‘मटा ऑनलाइन’च्या प्रतिनिधीने त्या शिक्षकाशी फोनवरुन चर्चा केली असता त्यांनी या संदर्भात सध्या बोलायला नकार दिलाय. मात्र, वेळ आली तर आम्ही नक्की तुम्हाला संर्पक करू आणि या विषयांवर बोलू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बदनामीपोटी तक्रारीसाठी टाळाटाळ

बदनामीपोटी हे तरुण तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. दरम्यान, पातुरचा हा परिसर वन विभागाकडे आहे आणि हे सध्या दुर्लक्षित पर्यटनस्थळ असल्याने इथे तरुणांचा कल जास्त असतो. त्यामुळे आता वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान, अद्याप आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. जर कोणी तक्रारीसाठी पुढे आले तर संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल. योग्य ते पाऊल उचलले जाईल, असे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा –मोदीजी तुमच्यामुळे आई मला मारते..! पहिलीतल्या मुलीची थेट पंतप्रधानांकडे पत्र लिहून तक्रार

पावसामुळे खुलले निसर्ग सौंदर्य; डोंगर, शेती, धबधब्याचे आकर्षक सौदर्य ड्रोनच्या माध्यमातूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.