मुंबई: मनोरंजन विश्वामध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यावर वाढत्या वयाचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. ‘वय हा केवळ आकडाच’ ही म्हण या अभिनेत्रींना तंतोतंत लागू होते. दरम्यान बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) हिचेही नाव या यादीत घ्यावे लागेल. शमाने आता चाळीशी गाठली आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी देखील तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. सोशल मीडियावर तिने अनेक बोल्ड फोटोजही पोस्ट केले आहेत. दरम्यान अभिनेत्री सध्या तिच्या एका बोल्ड व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

हे वाचा-कधीतरी आमच्या डोळ्यांनाही सुख मिळू द्या…रणवीरच्या न्यूड फोटोवर अभिनेत्रीची बोल्ड प्रतिक्रिया

शमा सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. चाहत्यांसह ती तिच्या आयुष्यातील अपडेट अनेकदा शेअर करते. तिच्या बिकिनी-मोनोकिनी लूक्सवर तर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडतो. दरम्यान अभिनेत्रीने सध्या एक हाय स्लिट पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये व्हिडिओ (Shama Sikander Video Viral) शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडत असून काही तासातच त्यावर विविध कमेंट्स आल्या आहेत. ‘Its a thing of beauty’ अशी कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.


अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही हॅशटॅग्ज वापरले आहेत, त्यावरुन ती बँकॉकमध्ये असल्याचे समजते आहे. याशिवाय तिने #mypenthouse असा हॅशटॅगही वापरल्याने हा व्हिडिओ तिच्या पेंट हाऊसमधील असल्याचे समजतेय. याठिकाणी ती सुट्टी एंजॉय करताना दिसत असून चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ विशेष आवडला आहे. या व्हिडिओद्वारे शमाच्या लग्झरी पेंट हाऊसची झलकही चाहत्यांना पाहायला मिळते आहे.


हे वाचा-कुणाच्या प्रेमात पडलीये प्राजक्ता माळी? फोटो शेअर करत म्हणाली- ‘तेरा यह इश्क’

याआधी अभिनेत्री शमाने विविध बिकिनी आणि मोनोकिनी लूकमधील फोटोही शेअर केले होते, त्यांचीही विशेष चर्चा झाली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी शमा तिची टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसते. तिचा फिटनेस अनेक चाहत्यांना थक्क करणारा आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.