मुंबई: असं अनेकदा आपण ऐकतो की दोन अभिनेत्री कधीही चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही. मात्र मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतील या दोन आघाडीच्या अभिनेत्री खूप चांगल्या मैत्रिणी आहे. एकांकिका करताना झालेली ओळख ते आयुष्यभरासाठी झालेली मैत्री असं काहीसं कनेक्शन या दोघींमध्ये दिसून येतं. या दोन अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे आणि अश्विनी कासार (Rutuja Bagwe and Ashwini Kasar Reels). या दोघींबाबत बोलायचं कारण म्हणजे सध्या त्यांचे रील्स इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत. ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असं म्हणतही त्यांनी एक रील शेअर केलं आहे.


सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ऋतुजा बागवे आणि अश्विनी कासार या दोघी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धमाल रील्स शेअर करत असतात. दोघींचे एकत्र किंवा स्वत:चे असे अनेक रील्स व्हायरल झाले आहेत. बॉलिवूड गाण्यांवर थिरकताना केलेल्या रील्सना प्रेक्षकपसंतीही मिळते आहे.

हे वाचा-५०० रुपयांचा पगार, भाडं देण्यासाठीही नसायचे पैसे; आज कोट्यवधींचा मालक आहे कॉमेडियन

ऋतुजा आणि अश्विनी दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ऋतुजा अश्विनीचा उल्लेख ‘द रील क्वीन’ असा करते. ती रील्स बनवण्यासाठी कायम उत्सुक असते असं ऋतुजा म्हणाली. अश्विनीची भेट झाली की ती कायम रील्स बनवायला लावते असं कॅप्शन देतही तिने त्याचं एक रील शेअर केलं आहे.


सध्या त्यांचे एका निसर्गरम्य ठिकाणी केलेले रील्स तुफान व्हायरल झाले आहेत. त्यांचे धबधब्याजवळ केलेले रील तर ‘ट्रॅव्हल गोल्स’ देत आहेत. याठिकाणी रील्स केल्याचा अनुभव आनंद देणारा होता अशी प्रतिक्रिया दोघींनी दिली आहे.


अशाच आणखी काही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी रील्स चित्रित केले आहेत. दोघींनी त्यांच्या घट्ट मैत्रीबद्दलही काही किस्से सांगितले. ‘आमची पहिली भेट एकांकिकेच्या निमित्तानं झाली. ‘हिस्ट्री ऑफ लिजेंड’असं त्य़ा एकांकिकेचं नाव होतं. तेव्हापासून आमच्या मैत्रीचं नात घट्ट होत गेलं’, असं दोघी म्हणाल्या. त्यांचे एकत्र असे आणखी रील्स बघायला आवडतील अशा त्यांना प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे आता ते कोणत्या गाण्यावरील व्हिडीओ पोस्ट करतात याची चाहते वाट बघत आहेत.

हे वाचा-‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या कलाकारांनी खऱ्या आयुष्यात कुणाशी बांधलेय लग्नगाठ?


वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अश्विनी अलीकडेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. तर ऋतुजा ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचं ‘अनन्या’ हे नाटक विशेष गाजलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.