मुंबई : आज वटपौर्णिमा. त्यानिमित्तानं अनेक स्त्रिया पूजेचं तबक घेऊन रस्त्यावरून जाताना आपण पाहतो. वडाच्या झाडाजवळ जाऊन त्या वडाची पूजा करतात. सात जन्मी हाच नवरा मिळो, म्हणून ही पूजा असते. वर्षानुवर्ष हेच सुरू आहे. अर्थात, त्याचं प्रतिबिंब अनेक मालिकांमध्येही आपण पाहतोय. मालिकांमध्ये वटपौर्णिमा जोरदार साजरी होत आहे. अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच काही वेगळे विचार शेअर करत असते. आजही तिनं वटपौर्णिमेनिमित्तानं पोस्ट शेअर केली आहे.

लाल साडीत खुललं ‘संजना’चं सौंदर्य, वटपौर्णिमा स्पेशल लूकसाठी स्वत:च केला मेकअप

आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर तिनं साता जन्माच्या गोष्टी असं हेडिंग देत पोस्ट केली आहे. त्यात हेमांगी लिहिते, ‘नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्त्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा, आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलंही आयुष्य वाढेल कदाचित! काय?’


त्यानंतर तिनं तळटीपही लिहिली आहे. ती म्हणते, ‘यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा!
तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचारणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो!’


नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हेमांगीचा हा विचार एकदम पटला आहे. तर काहींच्या भावना दुखावल्या, असंही ते म्हणालेत. काहींना तर चक्क हेमांगीला प्रश्न विचारलाय की तुम्ही किती झाडं लावलीत ते सांगा.

विसरता विसरत नाहीये सुशांतसोबतचे ते क्षण, अभिनेत्याच्या आठवणीत सारा भावुक

अभिनय क्षेत्रात हेमांगी कवीनं स्वत:ला अनेकदा सिद्ध केलं आहे. तिचं ती फुलराणी, ठष्ट, ओवी ही नाटकं गाजली होती. फू बाई फू शोमध्ये तर ती खूपच धमाल करायची. तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

‘जीव माझा गुंतला’ मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.