मुंबई: संपूर्ण भारतात नव्हे तर जगातील काही देशांमध्ये महाराष्ट्र राज्य जून महिन्यात चर्चेत आले होते. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेली बंडखोरी होय. शिवसेनेचे ४० आमदार शिंदेंसोबत पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावे लागले आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर अनेकांनी आजवर प्रतिक्रिया दिली आहे. पण आता अशी एक प्रतिक्रिया समोर आली आहे जी याआधी कोणी दिली नाही.

वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा सेटबॅक; या जिल्ह्यात ‘भोपळा’ फोडता आला नाही

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

झी मराठी या वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे करत आहेत. कार्यक्रमात एक गाणं ऐकवण्यात आले आणि त्यानंतर कोणाचा चेहरा आठवतो असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असे विधान केले.

वाचा- दिल्ली दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांची मुंबईत निर्णायक बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावर खलबतं

अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात ‘कशी नशिबाननं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकवण्यात आले होते. झी मराठी वाहिनीने या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यात हा भाग दाखवण्यात आलाय.

वाचा- कोण आहे अनिकेत जाधव? मिळाले २ कोटी ३५ लाखांचे मानधन


अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. भावा यांनी कशी नशिबाननं थट्टा आज मांडली’ हे गाणं हे ऐकवल्यावर कोणाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असे विचारल्यावर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे असे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांचा मी मान आणि सन्मान ठेवते. पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.