मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्या सातत्याने बातम्यांमध्ये आहे. प्राजक्ताची नवी सीरिज, प्राजक्ताचा नवा सिनेमा, प्राजक्ताची सोलो ट्रीप इ. बातम्या तुम्ही गेल्या काही दिवसांपासून वाचल्या असतील. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या योग साधनेच्या प्रेमविषयी सर्वांना माहित आहे. ती अनेकदा तसे व्हिडिओही शेअर करत असते. दरम्यान आता पुन्हा एकदा प्राजक्ताने सूर्यनमस्कार (Prajakta Mali Surya 108 Namaskar Video) करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने चक्क १०८ सूर्यनमस्कार एकाच वेळी घातले आहे. अभिनेत्रीची ही योग साधना बघून चाहते तिचं कौतुक करत आहेत.

हे वाचा-VIDEO: मंदाना करिमीने बुरखा घालून केला डान्स, नंतर जे झालं ते इथे वाचा

दरम्यान प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार घालताना तिच्या चाहत्यांनाही अशाचप्रकारे सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तिने हा एका तासाचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘१०८ सूर्यनमस्कार… जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो. कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर, काय म्हणता, करणार का? जमेल तितके करा…’ अभिनेत्रीने अशाप्रकारे सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन केल्यानंतर चाहतेही सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. २१ जून रोजी १०८ सूर्यनमस्कार घालण्याच्या प्राजक्ता माळीच्या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हे वाचा-गोड, गोंडस, Gone Case..! अमेय वाघने बायकोसाठी पोस्ट केला क्यूट VIDEO

प्राजक्ता सध्या तिच्या शूटिंग-प्रमोशनच्या शेड्यूलमध्ये व्यग्र असली तरी ती योग (Prajakta Mali Yoga) आणि प्राणायमासाठी वेळ काढतेच. तिने याआधीही योग साधनेचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आता शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देखील ती निसर्गाच्या सान्निध्यात सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर थकाव किंवा शीण अजिबात पाहायला मिळत नाही आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी अशाप्रकारे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच ती हिमाचल प्रदेशमध्ये सोलो ट्रीपसाठी जाऊन आली. त्यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांना तिच्या या ट्रीपविषयी वेळोवेळी अपडेट दिले होते.

प्राजक्ताच्या घरी आली खास पाहुणीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.