५९९ रुपयाचा ब्रॉडबँड प्लानची पूर्ण डिटेल्स
बीएसएनएलचा ५९९ रुपयाचा ब्रॉडबँड प्लान 3.3TB (3300GB) मासिक डेटा सोबत येतो. यूजरला 60Mbps ची स्पीड मिळते. म्हणजेच रोजचा खर्च १९ रुपये असेल. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2 Mbps पर्यंत कमी होते. यूजर्सला फिक्स्ड लाइन कनेक्शन सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सुद्धा मिळते. बीएसएनएलच्या या प्लान सोबत यूजर्सला पहिल्या बिलावर ५०० रुपयापर्यंतचे ९० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. कारण, या प्लानमध्ये कोणतेही अतिरिक्त बेनिफिट मिळत नाही. फायनल बिलाच्या किंमतीत १८ टक्के जीएसटी सुद्धा समावेश असतो. जर काही ओव्हर द टॉप (OTT) बेनिफिट्स सुद्धा बंडल करण्यात आले होते. हा प्लान एक किलर ऑप्शन बनतो. हा त्या घरासाठी चांगला आहे. जे मध्यम पद्धतीने इंटरनेटचा उपयोग करतात. 60Mbps स्पीडने विद्यार्थी सहज ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात. तसेच ऑफिसचे काम घरातून करू शकतात.
हा प्लान तुमच्यासाठी होऊ शकतो खास
जर तुम्हाला ओटीटी बेनिफिटचा बीएसएनएल प्लान हवा असेल तर बीएसएनएलचे अन्य दोन प्लानला एक्सप्लोर करू शकता. जे जबरदस्त स्पीड देतात. ७४९ रुपयाचा प्लान ओटीटी बेनिफिट् सोबत येतो यूजरला 100Mbps ची स्पीड देते. ७४९ रुपयाच्या प्लानसोबत यूजर्सला दर महिन्याला फक्त 1000GB डेटा मिळतो. हा सर्वांसाठी पुरेसा होवू शकत नाही.परंतु, अनेकांना उपयोगी पडू शकतो. बीएसएनएलकडे स्वस्त प्लान आहेत. अँट्री लेवल बीएसएनएल ब्रॉडबँड प्लान ३२९ रुपये प्रति महिना (टॅक्स सोडून) येतो. बीएसएनएल ब्रॉडबँड प्लान खरेदी करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जावू शकता.
वाचाः ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट, पाहा किंमत-फीचर्स
वाचाः १ जुलैपासून ऑनलाइन पेमेंटसाठी डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये होणार ‘हे’ बदल, पाहा डिटेल्स