नवी दिल्ली:Jio 666 Prepaid Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे प्रीपेड प्लान्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने आकर्षक प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीचा ग्राहकांना कमी किंमतीत जास्तीत जास्त बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न असतो. जिओचा ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, आता ग्राहक या प्लानवर २०० रुपयांची बचत करू शकतात. Jio च्या ६६६ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी एकूण १.५ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळते. याशिवाय, Jio Apps चा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो.

वाचाः Truecaller वर दिसणार नाही तुमचे नाव, करावी लागेल ‘ही’ सेटिंग; पाहा प्रोसेस

प्लानवर मिळेल २०० रुपये डिस्काउंट

Amazon Pay जिओच्या रिचार्जवर शानदार ऑफर देत आहे. कोणत्याही नवीन यूजरने Amazon Pay च्या माध्यमातून हा रिचार्ज केल्यास २०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सोबतच, नवीन यूजरला जिओ रिचार्जवर २५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल. मात्र, ऑफरचा फायदा घेण्यासाठी Amazon Pay च्या काही अटी देखील आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी अटी आधी जाणून घ्या.

वाचाः Friendship Day: WhatsApp स्टिकर्स पाठवून तुमच्या मित्र-मैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, असे मोफत करू शकता डाउनलोड

Airtel कडे देखील आहे ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान

खासगी टेलिकॉम कंपनी Airtel कडे देखील ६६६ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ७७ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच, Prime Video Mobile Edition चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. दरम्यान, जिओ व एअरटेल या दोन्ही प्लान्सची तुलना केल्यास Jio समान किंमतीत जास्त वैधता देत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार या प्लान्सची निवड करू शकता.

वाचाः अवघ्या ४९९ रुपयात शानदार इयरफोन्स भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये मिळेल २४ तासांची बॅटरी लाइफSource link

Leave a Reply

Your email address will not be published.