मुंबई-शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून कॅमेऱ्यापासून लांब होती. तिच्या आयुष्यातील काही वैयक्तिक चढ- उतारांमुळे तिने अभिनय, इव्हेंट, शो यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ‘निकम्मा’ सिनेमातून शिल्पा ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिचे चाहते तिला ऑनस्क्रिन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लेकीसह फोटो काढण्यासाठी जान्हवीकडे वडिलांची विनंती, अभिनेत्रीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

सध्या शिल्पा ‘निकम्मा’ सिनेमाच्या निमित्ताने मुलाखती देत आहे. हा सिनेमा १७ जून रोजी रिलीज झाला. शिल्पालाही या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतोय याची उत्सुकता आहे. शिल्पाने १३ वर्षांच्या विश्रांतीनंतर हंगामा सिनेमातून पदार्पण केलं होतं, पण तो सिनेमा फारसा चालला नाही.


शिल्पाने बॉलिवूडमध्ये ९० चं दशक गाजवलं. तिच्या नावावर अनेक हिट सिनेमे आहेत. बाजीगरपासून सुरू झालेला शिल्पाचा प्रवास आज ‘निकम्मा’ या सिनेमापर्यंत आला आहे. शिल्पाचा फिटनेस, तिची झिरो फिगर पाहण्यासाठी नेटकरीही तिच्या सोशल मीडियावरील फोटोंकडे नजर लावून बसलेले असतात. जिच्या मागे लाखो चाहते आहेत ती शिल्पा सध्या एका बॉलिवूड अभिनेत्यासाठी वेडी झाली आहे. ४७ वर्षाच्या शिल्पाचा जीव एका तरुण अभिनेत्यावर जडला आहे आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून कार्तिक आर्यन आहे. एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिल्पाने कार्तिक आर्यन तिचा क्रश असल्याचं सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.


कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘भूल भुलैय्या २’ या सिनेमाने कमावलेल्या दणदणीत यशाच्या आनंदात आहे. या सिनेमातील कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. भूल भुलैय्या सिनेमाच्या पहिल्या भागात जी भूमिका अक्षय कुमारने केली होती ती भूमिका आता नव्या सिनेमात कार्तिकने केली आहे. या सिनेमात कियारा आडवाणी आणि तब्बू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कार्तिकला सध्या करोनाची लागण झाल्यामुळे विश्रांती घेत आहे.

हॉकी प्रशिक्षकानंतर आता शाहरुख झाला महिला क्रिकेट संघाचा मालक

शिल्पा ‘निकम्मा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. यासिनेमाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत तिला जेव्हा विचारले की सध्याचा कोणता अभिनेता तुला आवडतो. यावर शिल्पाने कार्तिकचं नाव घेतलं. कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक करताना ती थकली नाहीच पण कार्तिक हँडसम आहे, तो माझा क्रश आहे असं खुल्लमखुल्ला सांगितलं.

निस्वार्थ प्रेम!, सिनेमा पाहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही रडू आलं, नेमकं असं काय घडलं?

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.