अक्षय गवळी, अकोला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. लग्नाचं आमिष दाखवून ३५ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप कांबळेंवर आहे. सध्या गजानन कांबळे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (वय ४५, राहणार वाशिम बायपास, अकोला) यांच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा विविध हॉटेलवर नेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील कांबळे यांनी दिली होती, असा आरोपही महिलेने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास पेठ पोलीस ठाण्यात गजानन कांबळे यांच्यावर ३७६ (२)(N), ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, गजानन कांबळे आणि तक्रारकर्त्या महिला यांच्यात गेल्या चार वर्षापासून ओळख असून पुढं त्यांच रूपांतर प्रेमात झालं होतं. या संदर्भात अधिक तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे करीत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.