मुंबई : निसर्गाची कमाल पाहा. तो असं काही करतो की सर्वसामान्यांसाठी ते मोठं संकट ठरतं. अशीच एक चिमुकली आहे चौमुखी. तिचा जन्म झाला तेव्हा तिला ४ हात आणि ४ पाय होते. आई-वडील गरीब. मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे पैसा कुठे होता? सोनू सूद नेहमीच गरजूंना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. करोना काळात तर सोनू सूदनं अनेकांना प्रचंड मदत केली. कोण आपल्या गावाला जाऊ शकलं होतं, कोणाला जीवदान मिळालं होतं. यावेळीही चौमुखीच्या मदतीला सोनू सूदच धावून आला.

Aryan Khan Case: एनसीबी अधिकाऱ्यासमोर रडला होता शाहरुख, म्हणाला आम्हाला गुन्हेगार केलं

चौमुखी बिहारच्या एका छोट्या गावात राहते. सोनूनं चौमुखीची शस्त्रक्रिया आणि औषधोपचार यासाठी मदत केली. त्यात यशस्वीही झाला. हाॅस्पिटलच्या बेडवरून त्यानं मुलीचे फोटो शेअर केले आणि लिहिलं, माझा आणि चौमुखी कुमारीचा प्रवास यशस्वी झाला. चौमुखी ४ हात आणि ४ पाय घेऊन बिहारमधल्या एका छोट्या गावात जन्मली होती. शस्त्रक्रियेनंतर आता ती घरी जायला तयार आहे.’

सोनू सूदचं कौतुक फक्त त्याचे फॅन्सच नाही करत. तर बाॅलिवूडचे सितारेही करत आहेत. सुनील शेट्टी, रिद्धिमा पंडित, पूजा बत्रा, ईशा गुप्ता यांनी इमोजी शेअर करत सोनू सूदवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. फॅन्सही अभिनेत्याची प्रशंसा करताना थकत नाहीत. लोकांनी लिहिलं आहे, तुझ्यासारखे खूप कमी जण आहेत. ईश्वर तुला सुखी ठेवू दे. दुसरा लिहितो, एकच तर हृदय आहे. किती वेळा जिंकशील! एका फॅननं लिहिलं, सर तुम्ही खूप ग्रेट आहात. अशा प्रकारे सोनू सूदचं कौतुक सुरू आहे.

‘अजूनही वाटतं की दीदीचा फोन येईल’, भावुक झाल्या आशा भोसले 92008271Source link

Leave a Reply

Your email address will not be published.