वृत्तसंस्था, कराची: पाकिस्तानमध्ये पोलिस उपअधीक्षकपदी प्रथमच एका हिंदू महिलेची नियुक्ती होणार आहेत. अनेक आव्हानांना तोंड देत मनीषा रोपेटा या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. स्त्रीवादी मोहिमेचे नेतृत्त्व करण्यासाठी आणि पितृसत्ताक समाजात लैंगिक समानता निर्माण करण्याचे आव्हान आपण स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.

२६ वर्षीय मनीषा या सिंध प्रांतातील जकोबाबाद येथील आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जाते आणि सर्वाधिक अत्याचारग्रस्त नागरिक हे पुरुषप्रधान पाकिस्तानमध्ये आहेत, असे त्यांना वाटते. मनीषा यांनी मागील वर्षी सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. १५२ यशस्वी उमेदवारांच्या गुणवत्ता यादीत त्यांनी सोळावा क्रमांक मिळवला. सध्या त्या प्रशिक्षण घेत आहे आणि त्यानंतर त्यांची लियारी या संवेदनशील भागात पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मनीषा यांच्या तीन बहिणी डॉक्टर आहेत आणि त्यांचा धाकटा भाऊ वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्या आपल्या आई-भावंडासह कराचीला आल्या.

‘आपल्या गावी मुलींनी उच्चशिक्षण घेणे मान्य नव्हते. जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना कळले की त्या पोलिस दलात सामील होत आहे तेव्हा आपण अशा आव्हानात्मक क्षेत्रात जास्त काळ टिकू शकणार नाही, असे त्यांना वाटले होते. परंतु त्यांची ही समजूत चुकीची आहे हे मी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.