वाचा: अँड्रॉइड युजर्स व्हा अलर्ट ! Google प्ले स्टोरमधील ‘या’ डझनभर Apps मध्ये आढळला Trojan Virus, पाहा डिटेल्स
या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस ४४० nits आहे. हे डिव्हाइस ९०.६ % च्या स्क्रीन टू बॉडी रेशोसह येते. या फोनमध्ये 3 GB व्हर्च्युअल 3 GB रिअल म्हणजेच एकूण 6 जीबी रॅम आहे. फोन 64 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. गरज भासल्यास युजर्स मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकतात. Smart 6 Plus मध्ये कंपनी MediaTek Helio G25 चिपसेट प्रोसेसर म्हणून देत आहे.
फोनच्या मागील बाजूस ड्युअल एलईडी फ्लॅशसह ८-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि डेप्थ लेन्स देण्यात आला आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी, तुम्हाला ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये दिलेल्या सेल्फी कॅमेऱ्याने तुम्ही फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकता. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी विशेष पॉवर मॅरेथॉन वैशिष्ट्यासह येते आणि बॅटरी लाईफ २५ % पर्यंत वाढवते. कंपनीचा दावा आहे की, बॅटरीचा स्टँडबाय टाइम ६० दिवसांपर्यंत आहे. फोन Android 12 Go Edition वर काम करतो. बायोमेट्रिक सुरक्षिततेसाठी, तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील मिळेल.