नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेले केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सणासुदीचा काळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंद घेऊन येईल. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास या महिन्यात मंजुरी मिळण्यास अपेक्षित आहे. यानंतर नवीन दराने महागाई भत्त्याही त्यांना महिन्याच्या अखेरीस दिला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA/DR वाढीचा निर्णय आज घेतला जाण्याची शक्यता आहे. तथापि, आजच्या बैठकीच्या अजेंड्यावर DA/DR चा मुद्दा असण्याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पूर्वीच्या अहवालानुसार सरकारने सुट्टीच्या हंगामापूर्वी वेतन वाढीची घोषणा करणे अपेक्षित आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदी आनंद! महागाई भत्ता वाढीसह सणासुदीत मिळणार आणखी एक गिफ्ट
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार DA वाढ
सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्त्याचा लाभ मिळेल जो १ जुलै २०२३ पासून लागू होईल. कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लांबली गेली असली तरी त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महागाई भत्त्याची थकबाकीही दिली जाईल. महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होताच ४२ टक्क्यांवरून DA ४६ टक्क्यांवर जाईल. यावेळी मार्च २०२३ मध्ये महागाई भत्त्यात ४% वाढ करण्यात आली होती.

Read Latest Business News

ET च्या अहवालानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA) ४% वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोने आणलेल्या औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो. अशाप्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेआधीच मिळणार पगार आणि बोनस
DA वाढीची घोषणा कधी होणार?
गेल्या तीन वर्षांचा कल पाहिल्यास ऑक्टोबरच्या शेवटी महागाई भत्ता जाहीर केला जातो. यावेळीही तीच अपेक्षा आहे पण, दसऱ्यापूर्वी सरकार महागाई भत्ता मंजूर करू शकते असा अंदाज आहे मात्र, सूत्रांनुसार यावेळी दसऱ्यापर्यंत वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी मिळणे शक्य नाही. पण, दसऱ्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read Latest Marathi News

7th Pay Commission: खात्यात जमा झाला थकीत पगार? मग ITR भरताना ही गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा होईल अडचण
दिवाळीत कर्मचाऱ्यांवर होणार ‘लक्ष्मी’चा वर्षाव
दरम्यान, या महिन्यात कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता जाहीर झाला तरी तो ऑक्टोबरच्या पगारात दिला जाईल. म्हणजेच या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ नोव्हेंबरमध्येच मिळेल. याशिवाय केंद्राच्या अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनसही दिला जातो. अशा परिस्थितीत दिवाळीत खर्च करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या चांगलीच रक्कम हातात येणार असून तीन महिन्यांची थकबाकी भरल्यासही मोठा दिलासा मिळणे अपेक्षित आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *