[ad_1]

हंगेरी: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चँम्पियन २०२३ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील भालाफेकीत सुवर्ण पदकावर नाव कोऱणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

हंगेरीतील बुडापेस्ट येथे पार पडलेल्या नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये त्याने आपले नाव सुवर्णपदकावर कोरले. ८८.१७ मीटर लांब भाला फेकत त्याने ही कामगिरी केली. दरम्यान, नीरजने दुसऱ्या फेरीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती.

पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमने स्पर्धेत चांगले पुनरागमन केले. नदीमने ७४.८० आणि ८२.८१ मीटरचे दोन थ्रो केले. पुन्हा तिसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८७.८२ मीटर अंतर पुर्ण केले. मात्र, त्याला सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आलेय. नदीमने रौप्य पदक आपल्या नावे केले.

भारताच्या डीपी मनू याने तिसऱ्या वेळी ८३.७२ मीटरचा थ्रो केला तर किशोर जेनाने दुसऱ्या थ्रो मध्ये ८२.८२ मीटर पूर्ण केले. हे दोन्ही भारतीय खेळाडू टॉप ८ मध्ये राहिल्याने त्यांना दुसऱ्या हाफमध्ये स्थान मिळवता आले. त्यामुळे त्यांना आणखी ३-३ थ्रो करण्याची संधी मिळाली.

प्रत्येक मोठ्या स्पर्धेत पदकांची कमाई करण्याचा शिरस्ता या वेळीही नीरजने कायम ठेवला. त्याने भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात कधी न घडलेला पराक्रम करुन दाखवला. नीरजने दोन पदकांची कमाई केली अन् तो वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने मागील वर्षी झालेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात नीरजने ८८.७७ मीटर भाला फेक करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याने पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. नीरजची ही कामगिरी या मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

गेल्यावर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. तसेच त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.२०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई खेळ या स्पर्धांमध्येही त्याने सुवर्णपदकांवर नाव कोरले होते.

Asia Cup मध्ये करोनाचे सावट, या संघातील दोन खेळाडूंना झाली लागण; स्पर्धा होणार की नाही?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *