[ad_1]

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीत तीनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सहा जागांवरील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होताना दिसत आहे. चव्हाणांच्या पक्षांतरानंतर भाजपनेही राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचं ठरवलं आहे. कारण भाजप तीनऐवजी चार जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून चौथा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतांच्या कोट्यानुसार भाजपला तीन जागा सहज जिंकता येणार आहेत. तर चौथ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक-एक जागा जिंकता येणार आहे. भाजपला तीन, अजितदादांना एक आणि एकनाथ शिंदेंना एक, अशा एकूण पाच जागा जिंकल्यानंतर उरलेल्या मतांतून सहाव्या जागेची बेगमी करावी लागणार आहे. याशिवाय अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या रुपाने भाजपला मोठी लॉटरी लागली आहे.
विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद
महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी चार जागा रिक्त असल्यामुळे आमदारांची संख्या २८४ इतकी आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. तर भाजप आमदार गोवर्धन शर्मा आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. त्यामुळे आमदारांची संख्या चारने घटून २८४ इतकी झाली आहे.
तीन पक्ष एकत्र, मला मतदारसंघच उरला नसल्याच्या चर्चा, पंकजा मुंडे मनातलं बोलल्या
राज्यसभेवरील एका जागेसाठी मतांचा कोटा ४० इतका होत आहे. काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ ४५ होतं. परंतु अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांच्यानंतर ते ४३ वर गेलं आहे. आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील ३ आमदार चव्हाणांच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यभरातील १२ ते १४ आमदार अशोक चव्हाण समर्थक असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे काँग्रेसची समीकरणं बिघडण्याची भीती आहे.

काँग्रेस पक्षानं अन्याय केल्यामुळे साहेबांनी राजीनामा दिला, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचं निर्णयाला समर्थन

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास अपात्रतेची शक्यता असते. त्यामुळे निवडणुकीला गैरहजर राहून अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाण समर्थक आमदार पडद्यामागची मदत करण्याची शक्यता आहे. अर्थात काँग्रेसच्या पाठीशी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या समर्थक आमदारांची ताकद आहे. परंतु मतांची जुळवाजुळव करताना नाकी नऊ येऊन काँग्रेसवर निवडणुकीपर्यंत टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *