[ad_1]

मुंबई : वर्षाच्या सुरुवातीलाच संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रख्यात संगीतकार उस्ताद यांचं मंगळवारी निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, राशिद खान यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कोलकात्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. अखेर आज मंगळवारी ३ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव कोलकात्यातील पियरलेस रुग्णालयात ६ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर आज रात्रभर कोलकातातील पीस हेवन रुग्णालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. १० जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उस्ताद राशिद खान यांना २०२२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. उस्ताद राशिद खान यांचं जाणं संपूर्ण देशासाठी आणि संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. त्यांच्या जाण्याचं अतिशश दु:ख असून अजूनही ते आता आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. मागील महिन्यात सेरेब्रल अटॅक आल्यानंतर उस्ताद राशिद खान यांची तब्येत अधिकच बिघडली होती. त्यांच्यावर सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कोलकात्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *