नितीन गडकरींच्या खात्यामुळे 1 लाख कोटींचा तोटा:कॅग रिपोर्टमध्ये ठपका, हायकोर्टात याचिका; ‘भारतमाला’ प्रकल्पावर हरकत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या महत्त्वकांक्षी भारतमाला प्रकल्पामुळे देशाचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात झाल्याचा दाखल झालेल्या एका याचिकेत करण्यात आला आहे. अब्दुल पाशा नामक सामाजिक कार्यकर्त्याने कॅगच्या अहवालाचा दाखला देत ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेनुसार, भारताच्या नियंत्रक व महालेखापालांनी 2023 मध्ये भारतमाला प्रकल्पाचे लेखापरीक्षण सादर केले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशात 74 हजार 942 किमीच्या महामार्गाचे काम केले जात आहे. यासाठी केंद्राने सप्टेंबर 2022 मध्ये साडे 5 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत प्रति किलोमीटर 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आला. यामुळे महामार्ग मंत्रालयावर अमाप कर्ज झाले, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ समितीने कारवाई केली नाही अब्दुल पाशा आपल्या याचिकेत पुढे म्हणतात, 2014 पर्यंत गडकरींच्या मंत्रालयावर 40 हजार कोटींचे कर्ज होते. भारतमाला प्रकल्पातील काही महामार्गाची गरज नसतानाही निर्मिती करण्यात आली. यामुळे करदात्यांचे सुमारे 1 लाख कोटींचे नुकसान झाले. स्वतः कॅगने आपल्या अहवालात हा ठपका ठेवला आहे. या अहवालाच्या आधारावर केंद्राच्या आर्थिक प्रकरणांच्या कॅबिनेट समितीने कारवाई करण्याची गरज होती. पण समितीने काहीच केले नाही. यामुळे या प्रकरणाची सीबीआय व ईडीमार्फत स्वतंत्र चौकशी केली जावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणात केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॅग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. कोर्टाने यावेळी याचिकाकर्त्याला हा अहवाल राष्ट्रपती व संसदेत सादर केला का? असा सवाल केला. तसेच यासंबंधी 2 आठवड्यांत शपथपत्रही सादर करण्याची सूचना केली. या प्रकरणी येत्या 25 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. हे ही वाचा… आपल्या बापाला कुणी लुटारी म्हणेल का?:शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली हे मी मान्य करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली हे मी कदापि मान्य करणार नाही. त्यांनी सुरतेवर स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी, तैमूरलंग यांनी जे केले त्याला लूट म्हणतात. पण शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांना हातही लावला नाही. त्यामुळे माझ्यावर कितीही टीका झाली तरी आपला बाप (शिवाजी महाराज) लुटारू होता हे मी मान्य करणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीवरील आपल्या दाव्याचे समर्थन केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. वाचा सविस्तर