कल्याणः ५ हजारांहून अधिक तृतीयपंथीयांच्या समुहाने एक आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. गोरगरीब गरजूंच्या पोटाची खळगी भरावी म्हणून आता तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतलाय. तृतीयपंथीयांच्या ख्याहिश फाऊंडेशनच्या माध्यमातून अवघ्या एक रुपयांमध्ये नाश्ता व दहा रुपयात जेवण भुकेल्यांना उपलब्ध करून दिले आहे. (kalyan)

७ सप्टेंबर रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास २७० जणांनी तिथे जाऊन जेवणाचा अस्वाद घेतला आहे. ख्वाहिश फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या पूनम सिंह यांनी ही माहिती दिली आहे. एका आठवड्यातच दिवसभरात जवळपास ५०० ग्राहकांनी आमच्या खानवळीला भेट दिली आहे. यामध्ये जवळच असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. ख्वाहिश फाऊंडेशनच्या मदतीने ही खानावण चालवली जात आहे. ही संस्था आपल्या कमाईतील एक रुपया दान करतात. तर काही संस्था अन्नधान्य दान करुनही मदत करत आहेत.

या गरीब थाळी केंद्राचा शुभारंभ ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदीवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृतीयपंथी यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या गरीब थाळी शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सूरी, सल्लागार पूनम सिंह, रिपाईचे अण्णा रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचाः देशातील पहिल्या चित्त्याचं घर असलेल्या ‘कुनो’सोबत आहे विदर्भाचे खास कनेक्शन

माझ्या समुदायातील लोकांसह, करोनामुळं उद्भवलेल्या लॉकडाऊन दरम्यान अन्न मिळविण्यासाठी धडपडताना पाहून मी गरजूंना अन्न देण्यासाठी स्वयंपाकघर सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं सिंह यांनी म्हटलं आहे. त्यावेळी मी कल्याणमधील रहिवासी समीर शेख यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी काही समस्यांमुळे त्यांचे हॉटेल बंद करावे लागले होते. त्यांनी ताबडतोब स्वयंपाकघरासाठी/ खानावळीसाठी त्याची जागा भाड्याने देण्याचे मान्य केले, असंही त्या म्हणाल्या. आम्ही सध्या नाश्त्यासाठी पोहे, उपमा आणि कधी कधी शीरा देतो. तसंच, जेवळात दोन चपात्या, एक भाजी, भात आणि डाळ असे संपूर्ण जेवण देतो, असं शेख यांनी म्हटलं आहे. सध्या भोजनालयात सात तृतीयपंथी आणि इतर १२ जण काम करतात.

समाजाकडून त्यांच्याशी भेदभाव केला जातो आणि त्यांना भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्यास भाग पाडले जाते. अशा ५,००० हून अधिक तृतीयपंथांनी गरजूंची सेवा करुनएक नवीन उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी उभारलेले भोजनालय हे टिटवाळ्यातील रहिवासी रमेश जाधव यांच्यासारख्या अनेकांसाठी उपयुक्त ठरलं आहे. जाधव यांच्या नातेवाईकांना जवळच्याच रुक्मिणीबाई दाखल केले आहे. अशावेळी “परवडण्याजोगे व चवदार आणि पोट भरणारे जेवण मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः गाडीसाठी ‘चॉइस’चा नंबर हवाय, पण भरावे लागणार लाखो रुपये, जाणून घ्या नवीन दर!

तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदीवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृयीत पंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीयपंथी बारावी आणि तीन जण बी. कॉमची परिक्षा देणार आहेत. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी तृतीय पंथीयांचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र देण्याचे काम सुरु आहे. राज्यभरातून ठाणो जिल्ह्यात ७८२ तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात अव्वल ठरला आहे. मुरबाड येथील फाऊंडेशनच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देणार असल्याचे नार्वेकर यांनी आश्वासित केले.

वाचाः भारतात चित्ता परतला, मुंबईत पण येणार?; अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.