पंढरपूर – मंगळवेढा विकास कामांसाठी 10 कोटी:राजमाता अहिल्यादेवी स्मारक 25 लाख तर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 15 लाख रुपये

पंढरपूर – मंगळवेढा विकास कामांसाठी 10 कोटी:राजमाता अहिल्यादेवी स्मारक 25 लाख तर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 15 लाख रुपये

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील ४० तर पंढरपूर शहरातील ४७ कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. आवताडे म्हणाले कि, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूरसाठी ५ आणि मंगळवेढा साठी ५ कोटी असे एकूण १० कोटी रुपये मंजूरीचा आदेश ३ सप्टेंबर रोजी निघाला आहे. या निधीतून पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सुधारणांसाठी २५ लाख रुपये, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासाठी १५ लाख रुपये, लिंगायत स्मशानभूमी सुधारणा साठी १५ लाख रुपये, हजरत बाराईमाम दर्ग्यातील कामांसाठी १० लाख रुपये, याशिवाय ८ उपनगरातील खुल्या जागा विकसित करणे, याशिवाय २७ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, ८ ठिकाणी सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये,मटण मार्केट येथे फुटपाथ करणे अशा कामासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पंढरपूर शहराबरोबर मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर हायमास्ट बसवणे, लतिफ़बाबा दर्गाह जवळ शादी खाना बांधकामासाठी ५० लाख रुपये, दर्गा परिसरात संरक्षित भिंत बांधणे,पथदिवे, विजेचे खांब बसवणे, रस्ते काँक्रीटीकरण, भूमिगत ड्रेनेज, नगरपालिका सभामंडप बांधणे अशा विविध ४० कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर झालेला आहे.

​पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील ४० तर पंढरपूर शहरातील ४७ कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. आवताडे म्हणाले कि, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूरसाठी ५ आणि मंगळवेढा साठी ५ कोटी असे एकूण १० कोटी रुपये मंजूरीचा आदेश ३ सप्टेंबर रोजी निघाला आहे. या निधीतून पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सुधारणांसाठी २५ लाख रुपये, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासाठी १५ लाख रुपये, लिंगायत स्मशानभूमी सुधारणा साठी १५ लाख रुपये, हजरत बाराईमाम दर्ग्यातील कामांसाठी १० लाख रुपये, याशिवाय ८ उपनगरातील खुल्या जागा विकसित करणे, याशिवाय २७ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, ८ ठिकाणी सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये,मटण मार्केट येथे फुटपाथ करणे अशा कामासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पंढरपूर शहराबरोबर मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर हायमास्ट बसवणे, लतिफ़बाबा दर्गाह जवळ शादी खाना बांधकामासाठी ५० लाख रुपये, दर्गा परिसरात संरक्षित भिंत बांधणे,पथदिवे, विजेचे खांब बसवणे, रस्ते काँक्रीटीकरण, भूमिगत ड्रेनेज, नगरपालिका सभामंडप बांधणे अशा विविध ४० कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर झालेला आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment