सिंधुदुर्ग : मालवणच्या समुद्रात दुर्दैवी घटना घडली आहे. मालवण तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कणकवली येथील काही युवकांपैकी एक युवक समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे. ही घटना आज सायंकाळी घडल्याची घटना समोर आली आहे. सुफियान दिलदार शेख (वय २४ रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. त्यानंतर दोन युवकांना थोडक्यात वाचावण्यात यश आले आहे. त्यांच्यावर मालवण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साकेडी मुस्लिमवाडी कणकवली येथील शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसेच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारूण शेख, अरबाज इम्तियाझ शेख (रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली) आणि शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी (सर्व रा. मुस्लिम वाडी हुमरठ ता. कणकवली) आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ (सध्या रा. नलावडे चाळ शिवाजी नगर कणकवली) असे एकूण ११ जण मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी मोटारसायकलने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते.

नदीत इअरप्लग घालून स्वीमिंग; समोर मगर येताच लोकांचा आरडाओरडा, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल!

सायंकाळी ते समुद्रात स्नानासाठी उतरले. व्हॉलीबॉल किनाऱ्यावर खेळत असताना सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी साहिल शेख आरडाओरडा करू लागला की दोघे पाण्यात वाहून जात आहेत. त्यामुळे सर्वजण त्या दिशेने धावले. मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले. अरबाज शेख याला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी मतीन हा बुडू लागला असता पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर आला. मात्र सुफियान हा समुद्राच्या पाण्यात आत वाहून गेला. त्याचा शोध सुरु होता. पाण्यात बुडालेल्या अरबाज व मतीन या दोघांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डाक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर व अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील कार्यवाही सुरु आहे.

स्वत:साठी आणलेली दारू पत्नीने… ; पतीला राग अनावर, पुढं जे केलं ते धक्कादायकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *