जॉन मॅकगिनेसला १९९७ साली १०० कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. त्याला घर बसल्या इतके पैसे मिळाले होते. पैसे मिळताच जॉन पागल झाला. त्याने काहीही विचार न करता पैसे उडवायला सुरुवात केली. त्याने बेंटले, मर्सिडीज, जग्वार, फरारी आणि बीएमडब्ल्यू मॉडेल्सच्या गाड्या खरेदी केल्या आणि स्वतःसाठी १३ कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला. याशिवाय ५ कोटींचे सीफेसिंग अपार्टमेंट खरेदी केल्यानंतर त्याने सुमारे ३० कोटी रुपये कुटुंबावर खर्च केले. नियोजन न करता पैसे गुंतवल्यानंतर त्याला समजले की त्याने लॉटरीच्या पैशातून जे काही जमवलं होते ते त्याने गमावले.
द सनशी बोलताना जॉनने सांगितले की, त्याने केवळ आलिशान कारच खरेदी केल्या नाहीत तर अनेक आलिशान ठिकाणी सुट्ट्याही घालवल्या. त्याने कबूल केले की त्याने जिंकलेले सर्व पैसे केवळ विलासी जीवन जगण्यासाठी वाया घालवले. पण, आता त्ला भीती वाटत आहे की तो त्याचे खर्च कसे पूर्ण करणार. एकेकाळी केवळ डिझायनर कपडे घालणारा आणि लक्झरी सुट्ट्यांवर दिवशी कोटींची उधळपट्टी करणारा जॉन आता गरीब झाला आहे.