[ad_1]

नवी दिल्ली : Oppo ने आपल्या खास अशा Independence day Sale 2023 ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ओप्पोचे स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट ऑफरमध्ये खरेदी करता येतील. हा सेल आधीच लाइव्ह झाला आहे, जो ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहील. त्यामुळे तुम्हाला Oppo स्मार्टफोन स्वस्तात घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ही बेस्ट संधी आहे.

Oppo स्मार्टफोन डिस्काउंट ऑफर
Oppo 10 Pro Plus, Oppo Reno 10 Pro 5G, Oppo Reno 10 5G, Oppo F21S Pro, Oppo F21S Pro 5G, Oppo F23 5G, Oppo A17, Oppo A58, Oppo Pad Air हे Oppo सेलमध्ये स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात. सेलमध्ये, स्मार्टफोन ओप्पो ई-स्टोअर आणि अधिकृत रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. सेलमध्ये, ग्राहक १० टक्के कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायावर स्मार्टफोन खरेदी करू शकतील. यासोबतच SBI, कोटक बँक आणि बडोदा बँकेचे बँड ऑफरमध्ये मोठ्या सवलतींचा आनंद घेऊ शकतील. या काळात ग्राहक उत्तम EMI पर्यायांवर स्मार्टफोन खरेदी करू शकतील.

ओप्पोने आपल्या ग्राहकांसाठी आणखी खास ऑफर्स आणली आहे. ज्यामध्ये एक्सचेंज ऑफर आणि लॉयल्टी बोनसच्या रूपात ४००० रुपयांच्या आणखी सवलतीचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, तुम्ही झिरो डाउनपेमेंट योजनेसह Oppo A17, Oppo A58 आणि Oppo F23 स्मार्टफोन खरेदी करु शकता. सेलमध्ये Oppo Pad Air फक्त १४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, तुम्ही २००० रुपयांच्या ऑफरचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान कोणतेही प्रोडक्ट विकत घेतल्यास, तुम्ही अतिरिक्त सूट मिळवू शकाल. याशिवाय तुम्ही या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला तीन महिन्यांसाठी YouTube Premium आणि Google One ची मोफत सेवा कंपनीतर्फे दिली जाणार आहे.

वाचा : JioBook येताच भारतात लॅपटॉप आयात करण्यावर बंदीचा नियम? काय आहे नेमकं कनेक्शन?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *