जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी. यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागणार आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे,अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, द पॉवर ऑफ वर्ल्डस फाउंडेशनच्या संस्थापक देबोरा सवाफ, डॉ डीनीस क्वॉर्डा, जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी, प्रा. रूझान पश्चू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी युनिव्हर्सिटीचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड , कार्याध्यक्ष राहुल कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पाडे उपस्थित होते. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, जागतिक शांततेच्या दिनी इराणहून इस्त्राइलवर २०० मिसाईल डागण्यात आले. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत जागतिक शांतता दिवस कसा साजरा करू शकतो. तसेच उच्च शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाला अधिक देण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. अशवेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून नवी पिढी घडवू शकतो. अध्यात्म हे अनुभवांकर आधारित असून आत्मिक आणि मानसिक शांतता मिळते. वर्तमान काळात दलाई लामा, नेल्सन मंडेला,य मार्टिन ल्युथर किंग, म.गांधी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. डॉ.विजय भटकर म्हणाले, २१ व्या शतकात शांततेने जगू शकू का हा प्रश्न सातत्याने निर्माण झाला आहे. सध्याच्या काळात मशीन आणि मनुष्य अशी जोडी भयानक वाटत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाला. त्यामुळे भविष्यात शांततेबाबत चिंता वाटते. प्रा.विश्वनाथ कराड म्हणाले,जगात शांतता नांदावी ही आता काळाची गरज आहे. जगाची परिस्थितीकडे आपण पाहिल्यास संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी यांचे विचार अंमलात आणावे. आपल्या विचारातून आळंदी, अयोध्या, अजमेर या शहरांना जोडावे लागणार आहे. देबोरा सवाफ म्हणाल्या,शांतता आणि एकात्मिकता प्रस्थापित करणे सर्वांची जवाबदारी आहे. तसेच मुलांना शाळांमधून ’इमोशनल इंटेलिजन्स’ शिकवण्याची गरज आहे. त्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. संस्कृती, अध्यात्म, विज्ञानाला ’इमोशनल इंटेलिजन्स’, ’इमोशनल कोशंट’ची जोड दिल्यास, आपण उत्कृष्ट युवा पिढी आणि जागतिक नेते नक्कीच घडवू शकू.