Calcium rich food : मजबूत हाडांसाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. हाडे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने पुरेसे कॅल्शियम (calcium) आणि व्हिटॅमिन डी (vitamin D) आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी हाडांसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व आहे. सामान्य परिस्थितीत, प्रौढांना दररोज 700 मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. यासाठी एक्सपर्ट दररोज संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात.

दूध, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या जसे की ब्रोकोली, कोबी आणि भेंडी इत्यादी, सोयाबीन, मासे हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत. आज 4 ऑगस्ट दिवशी बोन अँड जॉइंट डे (bone and joint day) निमित्ताने, दिल्ली स्थित सीताराम भरतिया इंस्टीट्यूट आणि होली फॅमिली हॉस्पिटलमधील सीनियर ऑर्थोपेडिक कंसल्टंट आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ बीरेन नाडकर्णी आपल्याला सांगत आहेत की, मजबूत हाडांसाठी आहारात काय व कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा?

केळी

केळी मॅग्नेशियमचा (magacium) चांगला स्रोत आहेत. मॅग्नेशियम हाडे आणि दातांची रचना तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व आहे. हाडे मजबूत होण्यासाठी दररोज केळीचे सेवन केले पाहिजे. कमकुवत हाडांची समस्या दूर करण्यासाठी दररोज एक केळ प्रभावी ठरू शकते.

(वाचा :- Heart Attack symptoms : भयंकर, हार्ट अटॅक येण्याआधी कानात दिसतात ‘ही’ लक्षणे, आधीच समजून घेतल्यास वाचेल जीव..!)

पालक

कॅल्शियमने भरपूर असलेल्या हिरव्या पालेभाज्या दात आणि हाडे तयार करण्यास मदत करतात. एक कप उकडलेला पालक शरीराच्या दैनंदिन गरजेच्या २५ टक्के कॅल्शियम पुरवू शकतो. फायबरने समृद्ध असलेल्या या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि आयर्न देखील मुबलक प्रमाणात असते. ज्याद्वारे तुमच्या शरीराला आणि हाडांना चांगले पोषण मिळू शकते.

(वाचा :- गुडघेदुखी, थायरॉइड, हार्ट स्ट्रोक, वेटलॉस, पोट साफ होण्यासाठी व वाढतं वय रोखण्यासाठी फक्त रोज प्या हे पाणी…!)

नट्स

नट्समध्ये कॅल्शियम असते, पण त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस (fosforus) देखील असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. मॅग्नेशियम हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमच्या वयानुसार हाडे मजबूत ठेवायची असतील तर नट्स चांगले पोषण देऊ शकतात.

(वाचा :- शौचास कडक होणं, पोट साफ न होणं व मुळव्याधाची समस्या झटक्यात होईल दूर, आजच करा आयुर्वेदिक डॉक्टरांचे हे 5 उपाय)

डेअरी प्रोडक्ट्स

दूध, दही आणि पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. जे हाडांच्या मजबुती आणि संरचनेसाठी सर्वात महत्वाचे जीवनसत्व आहे. एक कप दूध आणि एक कप दही हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे आपण दररोज खाऊ शकता.

(वाचा :- Gut Health Tips : बापरे, तुमच्याच या भयंकर चुकांमुळे आतडी सुकू लागतील व पिळ बसू लागेल, डॉक्टरांचा कडक इशारा.!)

संत्री

तुम्हाला माहित आहे का की, ताज्या संत्र्याचा रस शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’ प्रदान करतो, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. संत्र्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास ऑस्टिओपोरोसिसचा (osteoporosis) धोकाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो असेही सांगितले जाते.

(वाचा :- आयुष्यभर डायबिटीज होऊ नये व असेल तर वाढू नये म्हणून चुकूनही खाऊ नका ‘हे’ 7 पदार्थ, झपाट्याने वाढेल ब्लड शुगर..)

व्हिटॅमिन डी

आपल्या आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ‘डी’ मिळवणे बहुतांश लोकांना कठीण जाते. म्हणूनच मजबूत हाडांसाठी आपल्याला सूर्यप्रकाशापासून हे जीवनसत्व ‘डी’ मिळू शकते. पहाटे कोवळ्या उन्हात फिरणे हा उत्तम पर्याय असू शकतो. आपण दररोज सूर्यप्रकाशात फे-या मारून सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी आवश्यक त्या प्रमाणात मिळवू शकता. व्हिटॅमिन डी असलेली औषधे देखील बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

(वाचा :- Hepatitis A,B,C,D,E काय आहे? लिव्हर खराब करणा-या जीवघेण्या आजाराचा धोका या लोकांना जास्त, डॉक्टरांचा कडक इशारा)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.