मुंबई : मुंबईच्या वानखेडी स्टेडियमवर अफगाणीस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये एक अटीतटीचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार सलामीवीर इब्राहिम झद्रानने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धमाकेदार इनिंग खेळली आहे. त्याने कांगारू गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली आणि शानदार फटकेबाजी केली. २१ वर्षीय झद्रानने मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांसारख्या धोकादायक गोलंदाजांवर मात केली.

आपल्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर इब्राहिमने इतिहास रचत एक दमदार शतक झळकावले आहे. इब्राहिमने १३१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इब्राहिम झद्रानने डावाच्या ४४व्या षटकात जोश हेझलवूडविरुद्धच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी एखाद्या खेळाडूने शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तानसाठी विश्वचषकात शतक झळकावणारा इब्राहिम झद्रान पहिला खेळाडू ठरला आहे.

झद्रानने आपल्या शतकी खेळीत ७ चौकार लगावले. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध संघर्ष केला पण हार मानली नाही. झाद्रानचे हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक होते. त्याने केलेल्या पराक्रमासाठी तो वर्षानुवर्षे स्मरणात राहील. एवढेच नाही तर झद्रान या सामन्यात धावा करत नाबाद परतला आहे. त्याने १४३ चेंडूत १२९ धावांची अफगाणिस्तानसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत. इब्राहिमच्य शानदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना तब्बल ५ बाद २९१ धावा केल्या.

इब्राहिम झद्रानने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी ५ कसोटी, २६ एकदिवसीय (ऑस्ट्रेलिया सामना वगळून) आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३६२ धावा, एकदिवसीय सामन्यात ११४३ धावा आणि टी-२० मध्ये ५३० धावा केल्या आहेत.

उपांत्य फेरीच्या शर्यतीत बांगलादेश, न्यूझीलंड-पाकिस्तानच्या पुढे

सध्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. तिन्ही संघ चौथ्या स्थानासाठी लढत आहेत. मात्र, जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. तर तो उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरेल.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

विश्वचषकात शतक झळकावणारा चौथा सर्वात युवा फलंदाज

इब्राहिम जादरानने वयाच्या २१ वर्षे आणि ३३० दिवसांत शतक झळकावले आणि एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा चौथा सर्वात युवा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या महान फलंदाजांनाही मागे टाकले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *