नवी दिल्ली: असे म्हटले जाते की क्लास कधीच जात नाही आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होय. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्षे झाली, पण गोलंदाजांची धुलाई करण्यास तो विसरला नाही.

४९ वर्षीय सचिन तेंडुलकरने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लीजेंड्सकडून खेळताना एक असा षटकार मारला ज्याने चाहत्यांना १९९८ वर्ष आठवले. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९८ साली एक वादळी षटकार मारला होता. आता २४ वर्षानंतर सचिनने अगदी तसाच षटकार मारला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा- पावसाच्या सावटात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-२०; जाणून घ्या कसे असेल नागपुरचे हवामान

भारताचा दिग्गज फलंदाज सचिनने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीला ९ वर्ष झाली असली तरी फलंदाजी करताना असे वाटत नाही ती त्याने निवृत्ती घेतली आहे. गुरुवारी इंग्लंड लीजेंड्सविरुद्ध त्याने २० चेंडूत ४० धावा केल्या. यात ३ मोठ्या षटकारांचा समावेश होता.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याही सलामीच्या जोडीला असं करता आलं नाही

इंग्लंडविरुद्ध सचिन फलंदाजीला आला आणि सर्व चाहते पुन्हा एकदा जुन्या काळात गेले. सचिनने क्रिस ट्रेमलेटच्या ओव्हरमध्ये अगदी जुन्या स्टाइलने ६,६ आणि ४ अशा धावा मारल्या. सचिनने मारलेल्या दुसऱ्या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन सहजपणे २-३ पाऊल क्रीझ बाहेर आला आणि कडकडीत शॉट मारला. हा शॉट १९९८ साली शारजाह मैदानावर मारलेल्या षटकारा सारखाच होता. सचिनचा तो षटकार ‘डेजर्ट स्टॉर्म’ या नावाने ओळखला जातो.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १७० धावा केल्या. सचिनने ४० तर युवराजने ३१ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडला १५ षटकात फक्त १३० धावा करता आल्या आणि भारताने सामना ४० धावांनी जिंकला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.