नाशिक : येवला तालुक्यातील जवानाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण येवला शहरावर शोककळा पसरली आहे. अजित गोरख शेळके (वय २९) यांना राजस्थानमध्ये श्रीगंगानगर येथे वीरमरण प्राप्त झाले. भारतीय लष्कराच्या ५४ आर्मड रेजिमेंटमध्ये अजित शेळके कर्तव्यावर होते.

होळीच्या दिवशी अजित शेळके हे कर्तव्य आटोपून क्वार्टरकडे परत होते. यावेळी युनिटमध्ये त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात शेळके यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी झालेल्या शेळके यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण शनिवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत येवला तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी मानोरी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहचताच मानोरी बुद्रुक गावासह येवला तालुक्यात शोककळा पसरली आहे. शेळके यांच्या पश्चात वडील पत्नी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सकाळपासूनच त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि हितचिंतकांनी सांत्वनासाठी गर्दी केली. वीर जवान अजित शेळके यांच्या दुर्दैवी मृत्य शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना का थांबवलं नाही, ईडी सरकार असंवेदनशील | सुप्रिया सुळे

अजित शेळके यांच्या अपघाती मृत्यूनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यानी श्रद्धांजली अर्पण केली आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशी भावना व्यक्त करत भुजबळ यांनी अजित शेळके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नाशिककरांनो, स्वस्तात घर घ्यायचा विचार करताय? घरांच्या किंमतीत होणार वाढ, जाणून घ्या कारणSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *