राणी बेमन यांनी तीन लग्न केली, पण साथ एकाचीही मिळाली नाही

त्यांनी एकूण तीन लग्न केली, पण एकही लग्न टिकले नाही. दुसरा नवरा त्यांना कर्करोग झाला म्हणून सोडून गेला. ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूला त्यांनी निवडणूक जिंकून दिली, त्यांनीही नंतर राणी बेगम यांना नाकारले. कॅन्सरशी लढा एकदा जिंकला पण तो परत आला. त्यांची एकच इच्छा होती, ती म्हणजे त्यांच्या मुलीचे लग्न व्हावे. २७ मे १९९३ मध्ये याच दिवशी त्यांनी हे जग सोडलं.
प्रसिद्ध गायिका मुख्तार बेगम यांचे ड्रायव्हर होते राणीचे वडील

राणी बेगम उर्फ नसीराचा जन्म ८ डिसेंबर १९४६ ला लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील मोहम्मद शफी हे पाकिस्तानातील प्रसिद्ध गायिका मुख्तार बेगम यांचे ड्रायव्हर होते. राणी मुख्तार बेगम यांना भेटल्या होत्या. त्यांना पाहूनच आपणही गायिका व्हावं असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. गायिका मुख्तार बेगम यांनी आपल्या ड्रायव्हरची गरिबी पाहून, त्याची मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुख्तार यांनीच नसीराचे नाव राणी बेगम ठेवले. मुख्तार यांना स्वतःचे मुल नव्हते. मुख्तार बेगम राणीला स्वतःसारखी गायिका होण्यासाठी त्यांना शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण देत असत, पण राणीचा आवाज गायिका होण्यासाठी योग्य नाही हे लक्षात येताच त्यांनी आपला विचार बदलला.
वयाच्या १६ व्या वर्षी बनली हिरोईन, मिळाला वाईट अभिनेत्रीचा टॅग

राणीला नायिका बनवण्यासाठी मुख्तार बेगम तिला चित्रपट निर्माते फजल अली करीम यांच्या कराचीतील घरी घेऊन गेल्या. मुख्तार यांच्या सांगण्यावरून राणीने सर्वांसमोर नृत्य सादर केले आणि एका नाटकाच्या काही ओळी बोलून दाखवल्या. फजल अली यांनी आपल्या ‘चिराग जलता राहा’ या चित्रपटात अभिनेत्री दीबाला घेतले होते, म्हणून त्यांनी राणी यांना चित्रपट निर्माते जी.ए. गुलला पाठवले, जे नवीन मुलगी शोधत होते. जी.ए. अन्वर कमाल पाशा दिग्दर्शित मेहबूब या चित्रपटात गुलने राणीला साइन केले. अन्वर हा असा चित्रपट निर्माता होता ज्यांचे सर्व चित्रपट सुपरहिट झाले होते, परंतु राणीसोबत बनवलेला त्यांचा ‘मेहबूब’ (१९६२) चित्रपट फ्लॉप झाला. त्यांनी राणीला त्यांच्या इतर चित्रपटांमध्येही काम दिले, पण ते चित्रपटही फ्लॉप ठरले. एका महान चित्रपट निर्मात्याचे चित्रपट फ्लॉप झाल्याचा ठपका राणीवर ठेवण्यात आला आणि तिला वाईट नायिकेचा टॅग मिळाला.
चित्रपट निर्मात्यावर जडलं प्रेम, पण त्यानेही दिला दगा

यावेळी दिग्दर्शक अन्वर कमल पाशा यांनी राणीला मदत केली आणि तिला त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये घेत राहिले. ‘जोकर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राणी आणि कमल खूप जवळ आले होते. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले, पण कमालने अचानक अभिनेत्री शमीम बानोशी लग्न केले. कमलच्या बेवफाईमुळे राणी पुरत्या कोलमडल्या. पण, याचा परिणाम त्यांनी आपल्या फिल्मी करिअरवर होऊ दिला नाही. यानंतर १९६६ मध्ये आलेल्या देवर भाभी सिनेमात वहिदच्या विरुद्ध राणीची भूमिका होती.
देवर-भाभी चित्रपटाने हिट ठरली आणि पाकिस्तानची डान्सिंग क्वीन बनली

हा चित्रपट इतका जबरदस्त हिट झाला की राणी बेगम इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनली. लेडी किलर म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता वहीद मुराद राणीसाठी लकी ठरला, असे म्हटले जात होते. प्रसिद्ध अभिनेते वहीद मुरादसोबत राणी यांनी ‘अंजुमन’, ‘दिल मेरा, धडकन तेरी’, ‘खलिश’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘दीदार’, ‘सहेली’, ‘सिस्टर-ब्रदर’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली. आता राणी इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात कास्ट करू इच्छित होता.
हसन तारिक दिग्दर्शकाशी केले लग्न

‘देवर-भाभी’ या चित्रपटातून राणी बेगमवर लावलेला वाईट अभिनेत्रीचा टॅग हटवणारा दिग्दर्शक हसन तारिक होता. पुढे त्यांनी राणीला ‘बेहान-भाई’, ‘मेरा घर, मेरी जन्नत’ यांसारख्या चित्रपटातही काम दिले. १९७० मध्ये आलेल्या ‘अंजुमन’ या सिनेमातील तिचा अभिनय पाहून दिग्दर्शक हसन तारिक राणीच्या प्रेमात पडले. हसनने यापूर्वी 2 लग्ने केली असूनही राणीही त्याला पसंत करू लागली. दोघांनी १९७० मध्ये लग्न केले आणि काही वर्षांनी राणीने राबिया नावाच्या मुलीला जन्म दिला. आई होऊनही राणीच्या कामगिरीवर किंवा तिच्या करिअरवर कोणताही वाईट परिणाम झाला नाही.
उमराव जानच्या भूमिकेसाठी घेतली विशेष मेहनत

हसन तारिक यांनी पत्नी राणी बेगमसाठी ‘उमराव जान अदा’ हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राणीला मोहम्मद हादी रुसवा ही उमराव जान अदा ही कादंबरी वाचायला लावली, ज्यावर चित्रपट बनवायचा होता. राणीने ही कादंबरी ४ वेळा वाचली आणि लक्षात ठेवली. या भूमिकेसाठी राणीने कथ्थकचे सखोल प्रशिक्षण घेतले. ‘उमराव जान अदा’ या चित्रपटात राणी बेगमने उमरावची व्यक्तिरेखा इतक्या सुंदर पद्धतीने सादर केली होती की, चित्रपटाने पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर सुवर्णमहोत्सव साजरा केला.
राणी बेगममुळे श्रीमंतांनी पाकिस्तानी देहविक्री करणाऱ्यांशी लग्न करायला सुरुवात केली

चित्रपटाचे क्लायमॅक्स गाणे, ‘जो बचा था वो लुटाने लिए आये हैं..’ नूरजहाँने गायले, ज्यावर राणी बेगमच्या नृत्याने चित्रपटात जीव आणला. चॅनल इन्कलाबच्या मते, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक उच्चभ्रूंनी पाकिस्तानमधील देहविक्री करणाऱ्यांसोबत लग्न केले. अनेक मुलींना नवजीवन मिळाले. एकीकडे सिनेमात यश, पैसा, प्रसिद्धी मिळत असताना दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ यायला सुरुवात झाली होती. ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांचे पती हसन तारिकसोबतचे भांडण इतके वाढले की दोघांचा घटस्फोट झाला.
राणी यांनी एकट्यानेच केला मुलीचा सांभाळ

राणी यांनी एकट्याने मुलीची जबाबदारी उचलली. यानंतर राणी यांनी त्यांच्या आकंठ प्रेमात असणारे निर्माते मियाँ जावेद कमर यांच्याशी लग्न केले. जावेद यांचं राणीवर अतोनात प्रेम होतं. मात्र दुसऱ्या लग्नानंतर काही वर्षांनी राणी यांना कॅन्सर झाला. राणीने ही बातमी पती मियाँ जावेद यांना सांगताच राणीवर उपचार करण्याऐवजी त्यांनी लगेचच अभिनेत्रीला घटस्फोट दिला. राणी पुन्हा एकदा आपल्या मुलीसह एकट्या राहू लागल्या.
कर्करोगाच्या उपचारादरम्यान लंडनमध्ये क्रिकेटर सरफराजची भेट झाली

दुसरे लग्न तुटल्यानंतर राणीने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला, पण लंडनमध्ये उपचार सुरू असताना तिची भेट पाकिस्तानी क्रिकेटर सर्फराज नवाजशी झाली. दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. खरं तर, सरफराज राणीचा चाहता होता आणि तिला नेहमीच आवडत असे. अशा परिस्थितीत राणीच्या कॅन्सरचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला नाही. अखेर १९८५ मध्ये दोघांनी लग्न केले. क्रिकेटपटू पती सरफराजने पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश केला तेव्हा राणी बेगमने आपल्या स्टारडमच्या मदतीने त्याच्यासाठी सक्रियपणे प्रचार केला.
राणी बेगमच्या प्रसिद्धीचा फक्त फायदा उचलला

रॅलीमध्ये लोक तिला पाहायला येतील हे राणीला माहीत होते, त्यामुळे राणी तिचे आधुनिक कपडे आणि जड दागिने घालून ग्लॅमरस अवतारात येत असे. पार्टीचे लोक तिच्यावर साधे कपडे घालण्याचा दबाव आणत होते, पण ती कधीच राजी झाली नाही. सरफराज शेवटी १९८५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकले. सर्फराजला प्रत्येक पावलावर साथ देऊनही त्यानेही राणीला सोडले. तिसरे लग्न मोडल्यानंतर राणी पुन्हा एकट्या पडल्या होत्या.
त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली

८० च्या दशकात कर्करोगावर सतत उपचार घेतल्यानंतरही राणी बेगम चित्रपटांमध्ये दिसल्या आणि मुख्य भूमिका करत राहिल्या. लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर राणी बेगम कर्करोगमुक्तही झाल्या होत्या. १९६२- ८९ पर्यंत असे एकही वर्ष नव्हते जेव्हा राणी बेगम यांचा चित्रपट प्रदर्शित झाला नसेल. मात्र दुसऱ्यांदा कर्करोग झाल्यावर त्यांची कारकीर्दही संपुष्टात आली. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा राणी बेगम यांना पुन्हा एकदा कर्करोग झाला तेव्हा त्यांना माहीत होते की त्यांच्याकडे फार वेळ शिल्लक नाही.
राणी बेगम यांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीचेही निधन झाले.

कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना त्यांनी जगण्याची इच्छा सोडून देत कुटुंबियांसमोर आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. राणी यांना मुलगी राबियाचे लग्न त्या जिवंत असताना पाहायचे होते. राणीच्या इच्छेनुसार, राबियाने 1993 मध्ये डॉ. अन्वरशी लग्न केले, परंतु राणी लग्नाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. २७ मे १९९३ रोजी मुलीच्या लग्नानंतर काही दिवसांनी राणी बेगम यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या ३३ दिवसांनी त्यांची आई आणि काही दिवसांनी त्यांच्या बहिणीचेही निधन झाले.