जालौन: जर एखाद्याचं लग्न होत असेल तर त्याला ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील पोपटलाल याची उपमा दिली जाते. कारण, त्या मालिकेत पोपटलाल या पात्राचाही अनेक प्रयत्न करुनही विवाह होत नाही. असाच एक रिअल लाइफ मधला पोपटलाल लग्न होत नाही याची तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात धडकला. त्याचं हे गाऱ्हाणं ऐकून उपस्थित पोलिसांनाही हसू आवरलं नाही.

‘सर, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझे लग्न लावून देत नाहीत, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होतो आहे, कृपया माझे लग्न लावून द्या’, असं प्रार्थनापत्र घेऊन एक तरुण उत्तर प्रदेशातील जालौन येथील ओराई पोलीस ठाण्यात पोहोचला. या तरुणाने प्रभारी निरीक्षकांना अर्ज देताना लग्न लावून देण्याची विनंती केली. तो ३० वर्षांचा आहे, परंतु कुटुंब त्याचे लग्न करत नाहीये. त्यामुळे तो त्रस्त झाला आहे. त्याचा हा अर्ज घेऊन प्रभारी निरीक्षकांनी त्याला आश्वासन दिलं आणि घरी पाठवलं.

हेही वाचा –शाळेत का जात नाहीस, आईचा ओरडा असह्य, पुण्यात अल्पवयीन मुलाने शाळेतच जीवन संपवलं…

हे प्रकरण ओराई येथील आहे, जिथे जालौन तहसीलच्या शेखपूर एल्डरचा रहिवासी शाहिद शाहचा मुलगा मिठू लग्नासाठी अर्ज घेऊन ओराई पोलीस ठाण्यात पोहोचला होता. अतिरिक्त प्रभारी निरीक्षक अरविंद यादव यांना अर्ज देताना त्याने सांगितले की, माझे वय ३० वर्षे आहे. मात्र, अद्याप माझं लग्न झालेलं नाही. त्यामुळे मी जगण्याच्या अधिकारापासून वंचित आहे.

तो बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होता, पण घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अजून त्याच्या लग्नाचा विचार केला नाही. त्यामुळे त्याला मानसिक ताण आला आहे. जर त्याचे लग्न झाले नाही तर तो मानसिकदृष्ट्या वेडा होईल. त्याचे लग्न लवकर करा. जर तो विवाहित असेल तर तो लग्नानंतर आपल्या जीवनसाथीला नेहमी आनंदी ठेवेल. लग्न करुन दिल्याबद्दल तो नेहमी पोलिसांचा ऋणी राहील.

हेही वाचा –चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली

तरुण मानसिकदृष्ट्या खचला आहे

हा अर्ज पोलीस ठाण्यात पोहोचताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्ज वाचत असताना पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त प्रभारी निरीक्षकांनी त्याला बसवले आणि तिच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्याचे लग्न लावून देण्याचे आश्वासनही दिले. अर्ज मिळाल्यानंतर तरुणाच्या नातेवाइकांना पोलिसांनी बोलावले आणि त्यांच्यासोबत चर्चा केली.

दरम्यान, हा तरुण मानसिकदृष्ट्या खचला आहे. त्यामुळे तो नेहमी असे प्रकार करत असल्याचं नातेवाइकांकडून सांगण्यात आलं. सध्या कुटुंबीयांची समजूत घालून पोलिसांनी तरुणाला घरी पाठवले. दुसरीकडे, या प्रकरणी अतिरिक्त प्रभारी निरीक्षक अरविंद कुमार यादव सांगतात की, तरुण अर्ज घेऊन आला होता, त्याच्या कुटुंबीयांना समजावल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आलं आहे. त्याचवेळी पोलिसांनी नातेवाईकांना त्याच्यासाठी मुलगी शोधण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्याचे लग्न होऊन तो या दुःखातून बाहेर पडू शकेल.

हेही वाचा- प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मग तिथेच बसून खीर-पुरी खाल्ली, करवा चौथचा उपवासही ठेवला, पण..Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *