चैन्नई- दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी जयकुमारी या १९६० आणि १९७० च्या दशकात तमिळ आणि मल्याळम सिनेमांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्या त्यांच्या ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखल्या जायच्या. अभिनेत्री मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ग्रासल्या असून उपचारासाठी त्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जयकुमारी सध्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत आणि पैशांअभावी त्यांची अवस्था बिकट आहे.

पैशांअभावी उपचार थांबले आहेत

जयकुमारी यांना चैन्नईतील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे त्या मुलगा रोशनसोबत राहत आहेत. जयकुमार यांच्या पतीचे नाव नागापट्टिनम अब्दुल्ला होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

अभिनेत्रीला मदत मिळेल का?

वृत्तानुसार, जयकुमारी सध्या त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत, कारण उपचारांसाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो आणि ती इतकी रक्कम देण्याच्या त्या स्थितीत नाहीत. त्यांना आशा आहे की, सिनेसृष्टीतील लोक त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येतील. यापूर्वी कठीण काळात असलेल्या सहकलाकारांना चिरंजीवी आणि रजनीकांत यांनी मदत केली होती.

जयकुमारी यांचे सिनेमे

अभिनेत्रीने १९६८ मध्ये ‘कलेक्टर मालथी’ या मल्याळम सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यांनी ‘फुटबॉल चॅम्पियन’मध्ये प्रेम नझीर, ‘नूत्रक्कू नूरू’मध्ये जयशंकर आणि ‘मन्निना मागा’मध्ये डॉ राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘एन्गिरिंदो वंदल’, ‘हरमाना’, ‘नटरुक्कू नुरू’, ‘अनाथाई आनंदन’ आणि इतर अनेक चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली.

श्रद्धाचा नो मेकअप लूक, तरीही दिसते इतकी सुंदरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.