देशातील 36 सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांची निवड:यात चंदेरी साड्या विणण्यासाठी प्रसिद्ध म. प्र. चे प्राणपूर, अर्धे बुडालेले मंदिर असलेले हाफेश्वर गावांचा समावेश
चार दशकांपूर्वी ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे प्रसिद्ध झालेल्या हर्सिल गावाचा देशातील सर्वोत्तम पर्यटन गावांत समावेश झाला आहे. दुसरीकडे कैलास मानसरोवर यात्रेतील शेवटच्या टप्प्यावरचे गुंजी गावही पर्यटनाच्या नकाशावर आलेे. हर्सिल व गुंजी या गावांसह देशातील ३६ गावे यंदाची सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून निवड झाली आहे. देशातील ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९९१ गावांनी ८ श्रेणींमध्ये सर्वोत्तम गाव म्हणून निवड होण्यासाठी अर्ज केला होता.
खोड जाळणे ५० टक्के कमी करणाऱ्या पंजाबमधील हंसली आणि बंगालचे बडानगरही सर्वोत्कृष्ट गावांमध्ये समाविष्ट
जबाबदार गाव (५): या श्रेणीत मध्य प्रदेशातील ओरछाजवळील लाडपुरा खास व पचमढीजवळील साबरवानी गावाची या वर्गात निवड झाली. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील कडलुंडी, लेह जिल्ह्यातील तार व दादरा, नगर हवेलीतील दुधनी गाव हेही आहेत.
समुदाय आधारित गाव (५): बस्तरच्या चित्रकोट गावाची या श्रेणीत निवड झाली. ते नियाग्रा ऑफ इंडियासाठी प्रसिद्ध आहे. त्रिपुरातील अल्पना गावही याच श्रेणीत आहे. ते अल्पना कलेसाठी प्रसिद्ध आहे. याच श्रेणीत अजमेरचे देवमाली, लक्षद्वीपचे मिनिकॉय बेट व मिझोरामचे सियालसुकचा समावेश आहे.
साहसी पर्यटन गाव (४) : अनंतनागचे अरू गाव, बस्तरचे धुधामरस, उत्तरकाशीचे जाखोल आणि दक्षिण कन्नडचे कुटलूर गाव साहसी पर्यटन श्रेणीत निवडले गेले आहे.
हेरिटेज व्हिलेज (५): गुजरातमधील हाफेश्वर सर्वोत्तम हेरिटेज गाव आहे. अर्धे बुडालेले शिव मंदिर पाहण्यासाठी लोक येथे येतात. मणिपूरचे आंद्रो, पुरा महादेव (बागपत), माफलुंग व कीलाडी ही गावे या वर्गात आहेत.
शिल्प गाव (५): भगवान जगन्नाथांच्या कपड्यांतला खंडुआ पाटा जिथे बनतो अशा मणिबंध गावाची सर्वोत्तम क्राफ्ट गाव म्हणून निवड झाली. चंदेरी साड्या विणण्यासाठी म.प्र.चे प्राणपूर गावाचीही निवड.
कृषी पर्यटन (५): बंगालमधील वाराणसीची या श्रेणीत निवड झाली. येथे पर्यटकांना भात लावणी, पीक कापणी शिकवली जाते. पंजाबमधील हंसलीची शेतात जाळण्याच्या घटना ५०% कमी करण्यासाठी निवड झाली. रत्नागिरीचे करडे, कोट्टायमचे कुमारकोम, बागेश्वरचे सूपी यांचाही समावेश आहे.
आध्यात्मिक गाव (५): या श्रेणीत भगवान नृसिंह यांना समर्पित नंदियाल (आंध्र प्रदेश) मधील अहोबिलम, नागेशी व महालक्ष्मी मंदिरांसाठी प्रसिद्ध उत्तर गोव्यातील बांदोरा व पोंडाचे अंतुज महाल व देवघर (झारखंड) येथील रिक्कीपीठ गावांची निवड केली आहे.