Nagarjun in Brahmastra: अक्किनेनी नागार्जुन (Nagarjuna) दाक्षिणात्य सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तसंच त्यांनी बॉलिवूड सिनेमांतही काम केले आहेत. तामिळ आणि तेलुगू सिनेमांव्यतिरीक्त नागार्जुन यांनी अनेक हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. नागार्जुन यांच्या मते बॉलिवूडमध्ये काम करून त्यांच्यातील कलाकाराला, त्यांच्या मनाला शांती मिळते. नागार्जुन यांनी अलिकडेच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात काम केलं आहे. या सिनेमात त्यांनी नंदी अस्त्राची रक्षा (Nandi Astra) करणारा ‘आर्टिस्ट’अनिश शेट्टी ही भूमिका केली आहे. त्यांची भूमिका प्रेक्षकांनाही खूप आवडली आहे. तसंच या सिनेमात नागार्जुन यांची भूमिका अधिक मोठी हवी होती अशी मागणीही चाहते करत आहेत. नागार्जुन यांना सिनेमाचं कथानक आवडल्यानं त्यांनी एका अटीवर हे काम करायला तयारी दाखवली. याशिवाय त्यांनी या भूमिकेसाठी कशी तयारी केली, याविषयीही भाष्य केले आहे.

काय होती नागार्जुन यांची अट?

नागार्जुन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सिनेमा का घेतला, भूमिकेसाठी कशी तयारी केली याबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की, अयाननं त्यांना ब्रह्मास्त्र सिनेमा २०१८ मध्य ऑफर केला होता. या सिनेमातील आर्टिस्टची भूमिका साकारण्याची इच्छा जेव्हा अयानने व्यक्त केली, त्यावर मी त्याला विचारलं की, मी या सिनेमात नेमकं काय करायला हवं आहे. ही भूमिका ऐकल्यानंतर जर ती मला आवडली नाही तर मी करणार नाही. माझ्यासाठी भूमिकेची लांबी महत्त्वाची नाही तर ती भूमिका आवडणं महत्त्वाचं आहे.

​कॉमिक बुक घेऊन अयाननं समजावला रोल

नागार्जुन यांनी पुढं सांगितलं की, अयान हैदराबादला आला होता आणि त्यानं सिनेमाबद्दल मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. तो येताना बरोबर एक कॉमिक बुक घेऊन आला होता. त्याच्यात सिनेमातील प्रत्येक फ्रेमबद्दल लिहिलं होतं. त्यातल्या सगळ्या गोष्टी अयान मला सांगत होता. ते पाहून आणि ऐकून मी खूप आनंदित झालो. अशा पद्धतीचा सिनेमा बनवणारं असं कुणी तरी आहे, या विचारानं मला आनंद झाला. सिनेमाची गोष्ट ऐकता ऐकता मी जुन्या आठवणींमध्ये रमलो आणि सिनेमात काम करायला मी लगेच होकार दिला.

​सगळ्यांनी सगळीकडे काम करायला हवं

नागार्जुन यांनी सांगितलं की , ब्रह्मास्त्र सिनेमा योग्य संधी असल्यानं तो करायला मी होकार दिला. ते पुढं म्हणाले की, आता सगळे रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे कोणताही कलाकार कुठंही काम करू शकतो. भारत देश सिनेमांचं मोठं उद्योग केंद्र झालं आहे. हे असंच होणं अपेक्षितही आहे. कारण देशातील अनेक नागरिक सिनेमावर आणि क्रिकेटवर प्रेम करतात. नागार्जुन यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की,ब्रह्मास्त्र सिनेमाला पुढं घेऊन जायला मदत केली, याचा मला आनंद आहे. प्रत्येक कलाकारानं वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत आहेत. तशी संधी त्यांना मिळत आहे.

​अशी केली भूमिकेसाठी तयारी

ब्रह्मास्त्र सिनेमातील भूमिकेसाठी कशी तयारी केली याबद्दल नागार्जुन यांनी मुलाखतीमध्ये सविस्तरपणं सांगितलं. ते म्हणाले की,ही भूमिका मी करणार हे जेव्हा ठरलं तेव्हा मी टीव्हीवर पौराणिक मालिका बघू लागलो. लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत पाहिलं होतं. प्रेक्षकांना अशा प्रकारच्या कथा आवडतात. त्यावर बेतलेले सिनेमेही आवडतात. मी देखील महाभारत पाहिले होते ते त्यात दाखवलेल्या युद्धासाठी. युद्धामध्ये कोणत्याप्रकारची अस्त्र वापरतात हे बघायला मला आवडते. मी लहान असताना कॉमिक्स खूप वाचली आहेत. या सगळ्याचा फायदा भूमिका साकारताना झाला

‘​नंदी अस्त्र’साठी नागार्जुन यांना वाढवावा लागला वेग

नागार्जुन यांनी पुढं सांगितलं की, नंदी अस्त्राचे वरदान असणाऱ्या आर्टिस्टच्या भूमिकेसाठी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं होतं. अयाननं सांगितलं होतं की, माझ्या आजूबाजूला एक वेगळ्या प्रकारचा चार्ज असेल आणि माझे डोळे निळे होतील. धावता धावता माझा वेग वाढवावा लागेल कारण माझ्या मागे नंदी दाखवायचा आहे. ब्रह्मास्त्र सिनेमा ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नागार्जुन शिवाय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मौनी रॉय, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आहेत. या सिनेमाने वर्ल्डवाइड ३६० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर देशभरात या सिनेमाची कमाई १० दिवसात २१२ कोटींवर (पाचही भाषा) पोहोचली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.