मुंबई : तब्बल तीन तासानंतरही कार्यक्रम सुरु न झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार मंत्रालयातून निघून गेले. जाताना आयोजकांजवळ त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. फिफाच्या कार्यक्रम सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत अजित पवार पोहोचले. मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वेळेत न पोहोचल्याने अजितदादांना वेटिंगवर थांबावं लागलं. तीन तासांनंतरही कार्यक्रम सुरु न झाल्याने अखेर अजित पवार मंत्रालयातून निघून गेले.

मंत्रालयात नेमकं काय झालं…?

आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात फिफाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा संपन्न होणार होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण आज सकाळी शिंदे-फडणवीस सरकारची कॅबिनेट बैठक असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नियोजित वेळी कार्यक्रमाला येणं जमलं नाही. अजित पवार मात्र कार्यक्रमाच्या नियोजित वेळी मंत्रालयात हजर झाले.

माझ्यावर आरोप केलेत ना, आता लगेच चौकशी करा, पण एका अटीवर… पवारांनी भाजपचं आव्हान स्वीकारलं
कार्यक्रमाची नियोजित वेळ उलटूनही तब्बल तीन तासानंतर कार्यक्रम सुरु न होऊ शकल्याने अजित पवार यांनी मंत्रालयातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जाताना त्यांनी आयोजकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “कार्यक्रम नियोजित वेळी सुरु होणं गरजेचं असतं. पण आज जे झालं ते बरोबर नाही”, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली अन् मंत्रालयातून बाहेर पडले.

“तडजोडीतून मिळालेली सत्ता ही….” बोलता बोलता राज ठाकरे बरंच बोलून गेले!
अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यूँ आता है..??

“राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती. या बैठकीत काही महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी या वियांवर चर्चा केली. त्यामुळे बैठकीला वेळ लागला. अशावेळी अजितदादांनी समजून घ्यायला हवं, असं म्हणत अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यूँ आता है..?”, असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.