अक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 40 जणांना पोलिसी खाक्यात समज:250 जणांना नोटीस, दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्ह्यात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या २५० जणांना सायबर सेलने नोटीस पाठविल्या असून ४० जणांना प्रत्यक्ष बोलावून पोलिसी खाक्यात समज दिली आहे. सोशल मिडीयावर कमेंट व लाईक करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. तर दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात सण, उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिस दलाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देऊन शांतता समितीच्या बैठकाही घेतल्या आहेत. या शिवाय पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सुचनाही दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी १०० पेक्षा अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व छायाचित्रीकरणाच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात आला होता. मागील एक महिन्यात तब्बल २००० पेक्षा अधिक समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कारवाईची ही मोहिम यापुढेही सुरुच ठेवण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत. या शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तसेच त्या पोस्टला कमेंट व लाईक करणाऱ्यांवरही कारवाईच्या सुचना पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार दत्ता नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, प्रदीप जुनगरे, महिला पोलिस कर्मचारी प्रणिता मोरे यांच्या पथकाने सोशल मिडीयावर वॉच ठेवण्यास सुरवात केली आहे. यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या २५० जणांना नोटीस पाठविल्या आहेत. या शिवाय ४० जणांना प्रत्यक्ष बोलवून समज दिली आहे. सोशल मिडीयावर यापुढेही लक्ष राहणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. अफवा पसरविणाऱ्यांची गय नाही जिल्ह्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस दल सतर्क आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.