फ्लोरिडा: फ्लोरिडाच्या किनार्‍यावरील की वेस्टपासून ३० मैल अंतरावर समुद्रात बुडालेल्या ४०० वर्ष जुन्या जहाजात बरीच संपत्ती दडलेली आहे, ज्याचे नेमके ठिकाण अद्याप समजलेले नाही. आता या खजिन्याचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांनी कंबर कसली असून, ते या कामासाठी रात्रंदिवस झटत आहेत. या जहाजाचे नाव नुएस्ट्रा सेनोरा डी अटोचा (Nuestra Señora de Atocha) होते, जे शेकडो वर्षांपासून पाण्याखाली आहे. तिथे बुडालेला खजिना असल्याचं जाणकार सांगतात.

एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, आता या खजिन्याच्या शोधात मेल फिशर ट्रेझर्स (Mel Fisher’s Treasures) कंपनीचे ‘द डेअर’ हे जहाज फ्लोरिडाच्या ‘की वेस्ट कोस्ट’वर उभे आहे. यावरील पाणबुडे जवळजवळ दररोज मेटल डिटेक्टरसह समुद्रात खजिन्याच्या शोधात खाली उतरतात. सोने, चांदी आणि रत्नांनी भरलेले नुएस्ट्रा सेनोरा डी अटोचा एक स्पॅनिश ट्रेझर गॅलियन हे १६२२ मध्ये फ्लोरिडा किनारपट्टीवर चक्रीवादळात बुडाले होते, असे सांगितले जात आहे.

मेल फिशर ट्रेझर्स कंपनीचे म्हणणे आहे की, चार शतकं जुन्या जहाजाचा खजिना आता शेकडो वादळांमुळे समुद्राच्या तळावर दहा मैल पसरलेल्या ढिगाऱ्याच्या क्षेत्रात पसरला आहे.

उत्तरकाशीच्या बोगद्यात ३६ मजुरांच्या जीवन-मरणाची लढाई, पाईपमधून जेवण अन् ऑक्सिजनचा पुरवठा
पाणबुडे खजिना शोधत आहेत

अनेक दशकांपासून, शेकडो पाणबुडे या समुद्रकिनाऱ्यावर येत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक पाणबुडे आहेत, जे त्या खजिन्याचा वर्षानुवर्षे शोध घेत आहेत. या व्यतिरिक्त, मेल फिशर ट्रेझर्स कंपनीचे पाणबुजे देखील खजिना शोधण्यात गुंतले आहेत आणि बऱ्याच काळापासून कमर्शियल ट्रेझर हंटिग ऑपरेशन चालवत आहेत.

जहाजात किती संपत्ती असू शकते?

‘नुएस्ट्रा सेनोरा डी अटोचा’ या जहाजात एक मौल्यवान खजिना दडलेला आहे. त्यानंतर मेल फिशर ट्रेझर्स कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन्स डायरेक्टर गॅरी रँडॉल्फ (Gary Randolph) म्हणतात, आम्ही आजही सुमारे अर्धा अब्ज डॉलर्स किमतीचा खजिना शोधत आहोत.

पण काही इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ, मेल फिशर आणि त्यांच्यासारखे इतर, जे खजिना शोधण्यात व्यस्त आहेत, त्यांच्या विरोधात आहेत. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बुडालेली जहाजे चोरणाऱ्या समुद्री डाकूशिवाय ते दुसरे काही नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे.

गर्लफ्रेण्डसोबत बोलताना चार्जिंग संपली, मोबाइल चार्ज करता करता बोलत होता, तेवढ्यात स्फोट अन्…
Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *