Having a Baby At 40 : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर पॉवर कपल्सपैकी एक आहेत. या दोघांच नातं अनेक वर्षे फक्त प्रेमावर टिकून राहिलं आहे. करण आणि बिपाशा यांची पहिली भेट भूषण पटेलचा सिनेमा ‘अलोन’ मध्ये २०१५ साली भेटले. यानंतर २०१६ मध्ये या दोघांनी लग्न केलं.

लग्नानंतर जोडपी त्यांच कुटूंब वाढवतील अशी अपेक्षा असते. भारतात ही अपेक्षा सामान्यपणे केलं जातं. तशीच अपेक्षा बिपाशाकडूनही करण्यात आली. बिपाशाला अनेकदा मुलाखतीत विचारण्यात आलं; बेबी प्लानबाबत काय विचार आहे? तेव्हा बिपाशाने जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा मी आई होईन असं उत्तर देऊन उत्तर टाळलं. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार बिपाशा लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या सात वर्षांपर्यंत अनेकदा बिपाशाच्या आईपणाची चर्चा झाली. तेव्हा बिपाशाने त्या सगळ्या बातम्या अफवा असल्याचं सांगितलं.

गेल्या वर्षी रेडिओ होस्ट सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत करण म्हणाला होता की, ‘मी वडील बनण्यास तयार आहे, आता ही गोष्ट उशिरा का होईना. मला वाटतं आता मला स्वतःला थोडं मोठं व्हावं लागेल; मग बघूया पुढे काय होतं ते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​आई होणार आहे बिपाशा

मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशा लवकरच आई होणार आहे. लवकरच ती याबाबत अधिकृत माहिती देणार आहे. बिपाशाच्या अगदी जवळच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. करण आणि बिपाशा दोघंही अतिशय आनंदी आहेत. तसेच नवीन बाळासाठी खूप उत्साही देखील आहेत. बिपाशा पहिल्यांदा हे मातृत्व अनुभवणार आहे. बिपाशा आणि करणचे चाहते या बातमीनंतर आनंदी झाले आहेत. चाहत्यांना आता बिपाशाकडून ही बातमी कशी शेअर होते, हे पाहण्यात देखील एक वेगळा आनंद आहे. कारण आई होण्याचा आनंद प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो.

(वाचा – लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणं योग्य की अयोग्य? यामागची खरी कारणं समजून घ्या)

​बिपाशाचं वय

बिपाशा बसु हिचं वय ४३ वर्षे आहे. या वयात बिपाशा आई होणार आहे. पण यावयात आई होण्याची शक्यता फार कमी असते. गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर अर्चना नरूला यांच म्हणणं आहे की, वय जसं वाढत जातं तसं महिलेच्या ओवरीमधील अंड्यांची संख्या कमी होते. एवढंच नव्हे तर अंड्यांची क्वालिटी देखील कमी होते. त्यामुळे महिलांनी वयाच्या ३५ वर्षांपर्यंत गरोदर राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.कारण त्यानंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

(वाचा – मुलांच्या एकलकोंडेपणाला पालकच जबाबदार; पालकांच्या ‘या’ स्वभावामुळे मुलांवर होतात विपरीत परिणाम)

​काय असतो धोका?

यूएस नॅशनल बर्थ डिफेक्ट प्रिवेंशन स्टडीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिला चाळीशीनंतर आई होतात त्यांच्या मुलांमध्ये अनेक समस्या असतात. जसे की हृदयाशी संबंधीत आजार, लैंगिक विकृती, स्कल विकार इत्यादींचा धोका असतो. तसेच अनेक महिलांना पस्तीशीनंतर उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे त्रास जाणवतात. याचा देखील बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे चाळीशीनंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.

(वाचा – लंच आणि डिनरमध्ये दोन्हीवेळा मुलाला खायला द्या ‘हा’ सफेद पदार्थ, झपाट्याने उंची आणि हाडांची मजबूती दोन्ही वाढेल)

​अभ्यासाचा देखील पाठिंबा

एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, 43 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब आणि प्रीक्लेम्पसियाचे प्रमाण जास्त होते. त्याच वेळी, या महिलांमध्ये आयव्हीएफ आणि जुळ्या मुलांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीचे प्रमाण चारपट जास्त होते. तसेच पस्तीशीनंतर गर्भधारणेत थोड्या अडचणी येतात. त्यामुळे पस्तीशीनंतरच्या गर्भधारणेच्यावेळी डॉक्टर काही प्रमुख चाचण्या करून घेतात त्या आवश्यक असतात.

(वाचा – Getting Pregnant without Periods : मासिक पाळी येत नसली तरीही गर्भवती राहणं शक्य आहे का?))

​अशावेळी काय कराल?

प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक महिला ४३ व्या वर्षी गरोदर राहू शकते असं काही नाही. जर कुणाच्या शरीराची रचना वेगळी असेल तर काही महिला यावयात देखील हेल्दी मुलांना जन्म देऊ शकतात. त्यामुळे आशा सोडायला नको. कारण मेडिकल हेल्थमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्ही मातृत्व अनुभवू शकता.

(वाचा – ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या आईने ‘हे’ फळ खाल्यामुळे बिघडू शकते बाळाची तब्बेत?जाणून घ्या या मागचं सत्य))

इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी क्लिक कराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.