शेतकरी आंदोलन उपोषणाचा 44वा दिवस:डल्लेवाल यांची तब्येत आणखी बिघडली, बोलण्यातही अडचण
किमान हमीभावासाठी कायदा करावा, यासह इतर मागण्यांसाठी पंजाबच्या खनौरी सीमेवर ४४ दिवसांपासून उपोषण करणारे शेतकरी नेते जगजितसिंह डल्लेवाल यांची तब्येत आणखी बिघडली आहे. बुधवारी त्यांना बोलण्यातही अडचण येत होती. डॉक्टरांनी वैद्यकीय वार्तापत्रात सांगितले की, रक्तदाब कमी होत असल्याने त्यांचे पाय पलंगावर उंचीवर ठेवावे लागत आहेत. डल्लेवालांनी समर्थकांना सांगितले की, मी बोलू शकत नसल्याने मला भेटण्यास येऊ नका. इशारा: डल्लेवालांना काही झाले तर परिस्थिती चिघळेल डल्लेवालांकडे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. डल्लेवालांचे काही बरेवाईट झाले तर परिस्थिती आणखी चिघळेल, असा इशारा त्यांनी दिला.