जर तुम्ही विचार करीत असाल तर देशात ५जी सर्विसेज कधीपर्यंत उपलब्ध होईल तर तुमच्या माहितीसाठी दूरसंचार विभाग (DoT) ने आधी म्हटले होते की, भारतात २०२२ मध्ये ५जी इंटरनेट सर्विसेज सुरू केली जाणार आहे. काही क्षेत्रात आधीच ५ जी सर्विस दिली जाणार आहे. भारतात अजूनही काही ठिकाणी ४जी कनेक्टिविटी उपलब्ध नाही आहे. जाणून घ्या कोणकोणत्या जागी सर्वात आधी ५जी कनेक्टिविटी दिली जाणार आहे.
१३ शहरात भारतात ५जी कनेक्टिविटी मिळवणारे हे शहर
दूरसंचार विभाग (DoT) च्या माहितीनुसार, देशभरातील १३ शहरात सुरुवातीला ५जी सुविधा मिळणार आहे. या शहरात अमहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहराचा समावेश आहे. परंतु, सध्या अजून काही स्पष्ट सांगू शकत नाही की, भारतात सर्वात आधी कोणत्या टेलिकॉम ऑपरेटर कमर्शियल म्हणून ५जी सर्विसला कोण सुरू करणार आहे. यातील जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यापैकी कोणताही असू शकतो.
वाचाः स्वतःच्या फिटनेसची घ्या काळजी, घरी आणा योगा मोडसह येणारे ‘हे’ स्वस्त स्मार्ट बँड्स
वाचाः Samsung च्या बेस्टसेलर फोनला फक्त ७५० रुपयात खरेदीची संधी, पाहा ऑफर्स