नवी दिल्ली: 5G Internet : सध्या सर्वत्र 5G ची चर्चा असून भारतात 5G चे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी मीडियाला संबोधित करताना, भारतात 5G सेवा सुरू करण्याबाबत महत्वाची माहिती दिली. अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, सरकार स्पेक्ट्रम वाटप विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी २४ तास काम देखील करत आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी हा स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून स्पेक्ट्रम वाटप १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, स्पेक्ट्रम लिलावानंतर लगेच 5G नेटवर्क सुरू केले जाईल आणि स्पेक्ट्रमचे वाटप होताच भारतात 5G सेवा सुरू केल्या जातील. सप्टेंबर- ऑक्टोबरपासून भारतात 5G सेवा मिळू शकेल असेही दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

वाचा: Online Payment: ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची नाही गरज, फीचर फोनवरूनही सहज होतील पैसे ट्रान्सफर, पाहा प्रोसेस

या शहरांमध्ये प्रथम 5G नेटवर्क :

सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भारतात 5G सेवा सुरू होईल. यावर निर्णय झालेला नाही. पण, दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात १३ अशी शहरे आहेत जिथे 5G नेटवर्क प्रथम मिळेल. या १३ शहरांच्या यादीत अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.

वाचा: युजर्सचा फेव्हरेट आहे Jio चा ‘हा’ प्लान, ७०० GB पर्यंत डेटासह फ्री Netflix, Prime Video आणि हॉटस्टार मिळणार

माहितीनुसार, 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी लिलावाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून या काळात कंपन्यांनी मिडबँड आणि हायबँडमध्ये अधिक रस दाखवला आहे. ३३०० MHz आणि २६ GHz बँड तसेच ७०० MHz बँडमध्ये बोली प्राप्त झाल्या आहेत. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी १.४५ लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या आहेत.

४.३ लाख कोटी रुपयांचे 5G स्पेक्ट्रम :

२६ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान सुरू होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावात ४.३ लाख कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. यामध्ये ४.३ लाख कोटी रुपयांच्या एकूण ७२ GHz स्पेक्ट्रमचा समावेश असेल. जो २० वर्षांसाठी दिला जाईल. लिलावामध्ये ६०० MHz, ७०० MHz,८०० MHz, ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz आणि २३०० MHz फ्रिक्वेन्सी लो बँड, ३३०० MHz मिड फ्रिक्वेन्सी बँड आणि २६ GHz हाय फ्रिक्वेन्सी बँड यांचा समावेश असेल.

वाचा: 5G Spectrum Auction: पाहा कसे असेल 5G सिम आणि कोणत्या शहरात मिळेल सुपरफास्ट इंटरनेटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.