विधानसभा निकालानंतर विधान परिषदेची महायुतीमधील 6 जणांना लागणार लॉटरी:बावनकुळे, पडळकर, कराड, विटेकर निवडून आल्याने जागा होणार रिक्त

विधानसभा निकालानंतर विधान परिषदेची महायुतीमधील 6 जणांना लागणार लॉटरी:बावनकुळे, पडळकर, कराड, विटेकर निवडून आल्याने जागा होणार रिक्त

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या निकालानंतर विधान परिषदेवर असलेल्या सहा आमदारांचाही विजय झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नाराजांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आता महायुतीतील सहा जणांना विधान परिषदेची लॉटरी लागणार असून, सत्ता स्थापनेनंतर विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी नेत्यांमध्ये लॉबिंग होण्याची शक्यता आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके या विधान परिषदेतील ४ आमदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. हे चारही आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. भाजपच्या कोट्यातील चार जागा रिक्त झाल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांची ही विधानसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे शिवसेनेची विधान परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचीी जागा रिक्त झाली आहे. या सहा जागा होणार रिक्त ऑक्टोबरमध्ये सात जणांची विधान परिषदेवर वर्णी महायुतीकडून ऑक्टोबर महिन्यात ७ जणांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सहा जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment