जयपूर: राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. पिकं वाचवण्यासाठी एक शेतकरी किटकनाशक फवारत होता. त्यावेळी कीटकनाशक त्याच्या शरीरात गेलं. तो आजारी पडला. कुटुंबियांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. कीटकनाशक अतिशय विषारी असल्यानं शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला.शेतकऱ्याचा जीव वाचण्याची शक्यता अतिशय कमी होती. पण डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले. २४ दिवसांत रुग्णाला ५ हजार इंजेक्शन देण्यात आली. आता रुग्णाची प्रकृती ठीक आहे. शेतकऱ्याच्या शरीरात फवारणी दरम्यान ६०० मिली कीटकनाशक गेलं होतं.डॉक्टर प्रवीण गर्ग यांच्या पथकानं रुग्णाच्या गळ्याला एक छिद्र पाडून त्याला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. कारण रुग्णाला श्वास घेण्यास जमत नव्हतं. त्यानंतर त्याला एँटीडोट ड्रग एट्रोपिनची इंजेक्शन्स देण्यात आली. दिवसाला २०८ इंजेक्शन दिली जात होती. विषाचा प्रभाव संपवण्याचे प्रयत्न डॉक्टरांकडून सुरू होते. यासोबतच रुग्णाला औषधंही दिली जात होती.रुग्णावर २४ दिवस उपचार सुरू होते. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. २४ दिवसांनंतर त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारली. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. य़ाआधी अशी घटना अमेरिकेत घडली होती. एका व्यक्तीच्या शरीरात ३०० मिली कीटकनाशक गेलं होतं. त्याला डॉक्टरांनी ८ दिवसांत ७६० इंजेक्शन्स दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *